विदर्भात पक्ष बांधणीवर भर - राज ठाकरे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:17 PM2018-10-24T13:17:34+5:302018-10-24T13:18:34+5:30

अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (मनसे) विदर्भात पक्ष बांधणीवर भर देण्यात येत असून, पक्षाचे संघटन मजबूत करणे हेच आमचे सध्या उद्दिष्ट आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी येथे दिली. ‘

emphasizes on party formation in Vidarbha - Raj Thackeray | विदर्भात पक्ष बांधणीवर भर - राज ठाकरे  

विदर्भात पक्ष बांधणीवर भर - राज ठाकरे  

Next

अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (मनसे) विदर्भात पक्ष बांधणीवर भर देण्यात येत असून, पक्षाचे संघटन मजबूत करणे हेच आमचे सध्या उद्दिष्ट आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी येथे दिली. ‘मनसे’ची अकोला शहर व जिल्हा नवीन कार्यकारिणी दिवाळीनंतर गठित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी अकोला दौऱ्यावर आले असता, शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी ते बोलत होते. पक्ष बांधणीवर भर देऊन संघटन मजबूत करण्याचे काम सध्या ‘मनसे’च्यावतीने करण्यात येत आहे. त्यासाठी आपण जिल्हानिहाय दौरा करीत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. विदर्भातही हळूहळू पक्षाचे संघटन विस्तारत असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला शहर व जिल्हा मनसे कार्यकारिणीसंदर्भात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याने, दिवाळीनंतर मुंबई येथून पक्षाचे दहा पदाधिकारी अकोल्यात येतील आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. त्यानंतर पक्षाच्या अकोला शहर व जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात येणार असल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी मनसेचे नेते तथा माजी आमदार बाळा नांदगावकर, संजय चित्रे, मुंबईचे नगरसेवक संदीप देशपांडे, राजेश कदम, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, रामा उंबरकार, आदित्य दामले, सौरभ भगत, ललित यावलकर, सतीश फाले, रणजित राठोड, सचिन गव्हाळे, राकेश शर्मा, राजेश काळे, राजेश निनोरे व भूषण भिरड उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची घेतली माहिती!
जिल्ह्यातील लोकांच्या अडचणींसह शेतकºयांचे प्रश्न, पीक परिस्थिती आणि शेतीच्या समस्यांची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून घेतली.

जिल्हाधिकाºयांशी केली चर्चा; ‘मिशन मोर्णा’ची घेणार माहिती!
अकोला दौºयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी चहापानाचे निमंत्रण दिले; मात्र कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे राज ठाकरे चहापानासाठी जाऊ शकले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी चर्चा केली. ‘मिशन मोर्णा’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाºयांचे कौतुक करीत, पुढील अकोला दौºयात भेट घेऊन मोर्णा स्वच्छता अभियानाची माहिती घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी जिल्हाधिकाºयांना सांगितले.


जिल्ह्यातील संघटनात्मक कामाचा घेतला आढावा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत अकोला शहरासह जिल्ह्यातील पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा त्यांनी घेतला.

 

Web Title: emphasizes on party formation in Vidarbha - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.