कापूस , सोयाबीन उत्पादन वाढीवर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 17:58 IST2020-05-04T17:55:20+5:302020-05-04T17:58:18+5:30

कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर या पिकांच्या उत्पादनवाढीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

 Emphasis on increase in cotton and soybean production! | कापूस , सोयाबीन उत्पादन वाढीवर भर!

कापूस , सोयाबीन उत्पादन वाढीवर भर!

अकोला: जिल्ह्यातील महत्त्वाच्या पीक उत्पादन वाढीवर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले असून, यावर्षी त्यासाठीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांवर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. या पिकांची पीक उत्पादकता वाढीसाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. या पथदर्शी प्रकल्पात जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवून प्रत्यक्ष शेतात प्रात्यक्षिक देण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाशी निगडित विविध सहभागीदारांचा सहभाग घेण्यात येणार आहे. त्यात जिल्ह्यातील ४५६८ संस्थांना प्रत्येक गावाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यात या माध्यमातून पिकांच्या लागवड ते विक्री व विक्रीपश्चात प्रक्रिया या विविध टप्प्यांवर शेतीशाळा राबवून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या पीक उत्पादकता विकास कार्यक्रमात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर या पिकांच्या उत्पादनवाढीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

Web Title:  Emphasis on increase in cotton and soybean production!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.