आपत्कालीन पथकाचा स्वयंसेवक निष्कलंक व प्रशिक्षित असावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:18 IST2021-04-02T04:18:38+5:302021-04-02T04:18:38+5:30
वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या काटेपूर्णा शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पत्रकार ...

आपत्कालीन पथकाचा स्वयंसेवक निष्कलंक व प्रशिक्षित असावा
वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या काटेपूर्णा शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पत्रकार संजय उमक, बबलू यादव, नगरसेवक सचिन देशमुख, सामाजिक कार्यकर्ते गंपू शर्मा, सतीश अग्रवाल, काटेपूर्णाचे सरपंच प्रशांत पांडे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
संकटात सापडलेल्यांचा जीव वाचविणे हे आपत्कालीन पथकाचे लक्ष्य असल्याचे प्रास्ताविकातून पथक प्रमुख पुंडलिक संगेले यांनी सांगितले. यावेळी स्वयंसेवकांना गंपू शर्मा यांनी दिलेल्या गणवेशांचे वितरण करण्यात आले. पत्रकार प्रा.बेलाडकर यांनी स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण शिबिराची आवश्यकता अधोरेखित केली. सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते विलास वानखडे यांनी केले.
जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी दिलेल्या सीपीआर (बेशुद्धावस्थेतील व्यक्तीला वाचविण्याची श्वसन क्रिया)च्या प्रात्यक्षिकाने कार्यक्रमाची सांगता झाली.