साफसफाईच्या नावावर उधळपट्टी

By Admin | Updated: May 11, 2014 23:00 IST2014-05-11T21:43:03+5:302014-05-11T23:00:45+5:30

स्वच्छतेअभावी वाशिम जि.प.तील प्रसाधनगृहे बंद

Embarrassment in the name of cleanliness | साफसफाईच्या नावावर उधळपट्टी

साफसफाईच्या नावावर उधळपट्टी

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसर व इमारतीतील सर्व माजल्यांसह सभागृहातील सर्व शौचालये, मुत्रीघरे, स्नानगृहांची स्वच्छता करण्याचे ४.९९ कोटी रुपयांचे कंत्राट एका खासगी स्वयंरोजगार सहकारी संस्थेला देण्यात आलेले आहे.सदर कंत्राट स्पर्धात्मक निविदा न मागविता एकाच संस्थेला ठरवून देण्यात आले आहे.ते नियमबाह्य आहे.विशेष म्हणजे जिल्हा परिषदेतील मुत्रीघरे शौचालये, स्नानगृहांची व्यवस्थित स्वच्छता केली जात नाही.सफाईची बिले मात्र, नियमितपणे काढली जातात. विशेष म्हणजे जि.प.तील बहुतांश मुत्रीघरे, शौचालये नेहमीच कुलूप बंद ठेवली जात आहेत. वाशिम जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतीच्या कक्षातच शौचालये, मुत्रीघरे उपलब्ध होती. जिल्हा परिषदेतील कर्मचारी व नागरिकांसाठी शौचालये व मुत्रीघरे उपलब्धच नव्हती त्यामुळे कर्मचारी व नागरिकांना जेथे जागा मिळेल तेथे उघडयावर जाउन लघूशंका उरकावी लागत असे शौचास जायचे असल्यास कर्मचार्‍यास त्याचे घर तर बाहेरगावच्या नागरिकास बसस्थानकाचे सुलभ शौचालय किंवा एखादे हॉटेल गाठावे लागत असे पंरतु, जिल्हा परिषदेची सर्व कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये घाई गडबडीत स्थानांतरीत करण्यात आली होती. त्यानंतर या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये सर्व मजल्यावरील शौचालये, मुत्रीघरे, स्नानगृहासह परिसराची साफसफाई होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या १0 ऑगस्ट २0११ च्या सभेमध्ये जि.प.तील सर्व सफाई करण्यासाठी चार सफाई कामगारकंत्राटी पद्धतीने रोजदारीवर लावण्याबाबत चर्चा होउन तसे प्रास्तावित करण्यात आले होते. तथापि, तत्कालीन जि.प.उपाध्यक्ष देवेंद्र ताथोड, तत्कालीन जि.प.सदस्य दिलीप जाधव व अरविंद इंगोले यांनी त्याच सभेत सदर काम एखाद्या संस्थेला द्यावे असे सुचित केले होते. त्यानुसार तत्कालीन स्थायी समिती सदस्य जयकिसन राठोड यांनी पत्राव्दारे कळविल्यानुसार एकता स्वयंरोजगार सहकारी संस्थेस जिल्हापरिषदेच्या सर्व मजल्यावरील शौचालये, प्रसाधनगृहे , स्नानगृहे व जिल्हापरिषद परिसातील सफाईचे कंत्राट न देता जिजाऊ स्वयंरोजगार सहकारी संस्था र्मयादीत पार्डीटकमोर यांची कंत्राटदार म्हणून नेमणूक करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ४ फेब्रुवारी २0१२ च्या स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला होता. त्यानंतर १८ जून २0१२ च्या रोजीच्या स्थायी समितीसभेत ठराव क्र.४ अन्वये वाटाघाटीअंती ४ लाख ९९ हजार रुपये प्रती वर्षीच्या प्रमाणे हे कंत्राट जिजाउ स्वयंरोजगार सहकारी संस्था पार्डीटकमोर या संस्थेस देण्याबाबत ठरविण्यात आले मात्र, प्रत्यक्षात याबाबतच्या आदेश सदर संस्थेने १00 रुपयाच्या बंधपत्रावर करारनामा सादर केल्यानुसार माहे, फेब्रुवारी २0१३ पासून ३१ जानवारी २0१४ पर्यंतच्या कालावधीसाठी दिले. साफसफाईसाठी कमीतकमी ७ कामगार ठेवणे आवश्यक असल्याचे सुटयांच्या काळातही सफाई करणे बंधनकारक असल्याचे करारनाम्यात नमूद करण्यात आले होते. परंतु जि.प. इमारतीमधील पत्येक मजल्यवरील मुत्रीघरे शौचालयांची स्वच्छता आजही नियमित होत नाही परिणामी जि.प.इमारतीमधील बहुतांश मुत्रीघर, शौचालये, शेजारच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याने कायम स्वरुपी कुलुप बंद ठेवली जातात विशेष बाब म्हणजे यासंबंधी जिजाऊ स्वयंरोजगार संस्थेने ४-५ महिन्यापासून स्वच्छता सेवेचे कंत्राटी काम करीत आहेत पंरतु मागील एक ते दोन महिन्यापासून जि.प.इमारतीमध्ये पाणी नसल्यामुळे स्वच्छता करताना अडचण येत आहे. इमारतीत शौचालये, मुत्रीघरांची दैनंदीन साफसफाई करण्याकरीता पाणी आवश्यक असल्यामुळे आपणास लवकरात लवकर पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी असे कळविले होते. परंतु, त्यानंतरही जि.प.इमारतीमधील बहुतांश मुत्रीघरे शौचालये कुलुपबंदच राहत असल्याने तेथे काम करणारे कर्मचारी व कामानिमित्त तेथे जाणार्‍या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

 

Web Title: Embarrassment in the name of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.