लक्झरी स्टँडवरील अतिक्रमणाचा सफाया

By Admin | Updated: January 9, 2015 01:26 IST2015-01-09T01:26:17+5:302015-01-09T01:26:17+5:30

अकोला येथील अतिक्रमण निमुर्लन मोहिम;अनधिकृत फलक व झेंडही काढले.

Elimination of encroachment on luxury stand | लक्झरी स्टँडवरील अतिक्रमणाचा सफाया

लक्झरी स्टँडवरील अतिक्रमणाचा सफाया

अकोला : शहरातील अनधिकृत फलक, चौकातील नामफलक, झेंडे काढण्यासोबतच पोलीस पथक व महापालिकेने शहरातील अतिक्रमणावरदेखील लक्ष केंद्रित केले. गुरुवारी दुपारी पोलीस पथकाने महा पालिकेच्या मदतीने लक्झरी बसस्टँडवरील अतिक्रमणाचा सफाया केला. लक्झरी बसस्टँड व पोलीस मुख्यालयासमोर अनेकांनी टीनपत्र्यांची खोके थाटून अतिक्रमण केले. या अतिक्रमणाचा त्रास पोलीस मुख्यालयातील कर्मचार्‍यांनाही होत असल्याने साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बुधवारी पोलीस पथकाला लक्झरी बसस्टँडवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले.
पोलीस पथक व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अनधिकृत फलक, होर्डिंंग्ज, झेंडे, दुकानांवरील बोर्ड, चौकांमध्ये विनापरवानगी लावण्यात आलेले लोखंडी फलक हटविण्याची विशेष मोहीम ६ जानेवारीपासून सुरू करण्यात आली. गुरुवारी पोलीस पथक गोरक्षण रोड व शिवणी परिसरामध्ये कारवाईची मोहीम राबविणार होते; परंतू अचानकपणे पोलीस व महापालिकेचे पथक पोलीस मुख्यालयासमोरील लक्झरी बसस्टँड परिसरात पोहोचले आणि परिसरातील ट्रॅव्हल्स एजन्सींवर लावलेल्या फलकांसह परिसतील लोखंडी नामफलकही हटविले. त्यानंतर पथकाने गजराजाच्या मदतीने परिसरातील अतिक्रमित टीनपत्र्यांची खोके, पानठेले, हॉटेल हटविले. त्यामुळे येथील व्यावसायिक व ट्रॅव्हल्स एजन्सी चालकांची एकच धावपळ उडाली. काहींनी तर स्वत:हून अतिक्रमण हटविले.

Web Title: Elimination of encroachment on luxury stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.