शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

विषारी औषध देऊन घेतला अकरा माेकाट श्वानांचा बळी, जुने शहरात डाबकी राेड परिसरातील घटना; श्वान पालकांमध्ये भीती

By आशीष गावंडे | Updated: September 28, 2022 15:19 IST

Akola: शहरातील डाबकी राेडस्थित ज्ञानेश्वर नगर, फडके नगर, गणेश नगर व महाराणा प्रताप चाैक भागातील तब्बल अकरा माेकाट श्वानांना विषारी औषधी देऊन त्यांचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार २६ सप्टेंबर राेजी उघडकीस आला आहे. 

- आशिष गावंडेअकाेला -  शहरात माेकाट श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेचे नसबंदी धाेरण सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे. जुने शहरातील डाबकी राेडस्थित ज्ञानेश्वर नगर, फडके नगर, गणेश नगर व महाराणा प्रताप चाैक भागातील तब्बल अकरा माेकाट श्वानांना विषारी औषधी देऊन त्यांचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार २६ सप्टेंबर राेजी उघडकीस आला आहे. 

श्वानांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटना समाेर आल्यानंतरही अशा कुत्र्यांना पकडताना महापालिका प्रशासनाकडून नियमांचे दाखले दिले जातात. पिसाळलेल्या कुत्र्याने किमान तीन जणांना चावा घेतला असेल तरच त्याला पकडता येते, असा अजब तर्क मनपाने नसबंदीसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीकडून दिला जात असल्यामुळे प्रशासनाप्रती नागरिकांमध्ये तिव्र असंताेष निर्माण झाला आहे. भटक्या श्वानांना पकडून त्यांची नसबंदी करण्याची प्रक्रिया दिर्घ असल्यामुळे वर्तमानस्थितीत वाढलेल्या कुत्र्यांची समस्या तातडीने निकाली काढण्याची अपेक्षा अकाेलेकरांकडून व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या जीवीताला धाेका निर्माण झाल्यानंतरही प्रशासन ठाेस उपाययाेजना करत नसल्याचे दिसत आहे. त्याचे परिणाम मुक्या निष्पाप जनावरांना भाेगावे लागत आहेत. डाबकीराेडस्थित ज्ञानेश्वर नगर, फडके नगर, गणेश नगर व महाराणा प्रताप चाैक भागातील माेकाट श्वानांना विषारी औषधी देऊन त्यांचा बळी घेतल्याचा अमानवीय प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे डाबकी राेड परिसरातील श्वान पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

उंदिर मारण्याची दिली औषधीमहाराणा प्रताप चाैक, गणेश नगर भागात रविवारी रात्री काही माेकाट श्वान अत्यवस्थ असल्याचे स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले. रहिवाशांनी यातील काही श्वान उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले असता, त्यांना उंदिर मारण्याची औषधी दिल्याचे समाेर आले. अत्यवस्थ श्वानावर उपचार केल्यानंतरही त्याचा साेमवारी मृत्यू झाला.

श्वान पालकांनाे खबरदारी घ्या!घरात महागड्या जातीचे श्वान पाळणे ही आजकाल फॅशन झाली आहे. परंतु त्यांचा सांभाळ करताना अनेकांची कसरत हाेते. श्वान मालक सकाळ,संध्याकाळ श्वानाला घराबाहेर घेऊन निघतात. श्वान खुल्या जागेऐवजी स्थानिक रहिवाशांच्या प्रवेशद्वारात नैसर्गिक विधी उरकतात. घरासमाेर अस्वच्छता निर्माण हाेत असल्यामुळे रहिवाशांमध्ये श्वानांबद्दल तिरस्कार निर्माण हाेताे. यातूनही अनेकदा विषारी औषधी देण्याचे प्रकार घडत असल्याने श्वान मालकांनी असे प्रकार कटाक्षाने टाळण्याची गरज आहे.

टॅग्स :dogकुत्राAkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी