विजेच्या धक्क्याने शेतक-याचा मृत्यू!

By Admin | Updated: March 12, 2017 02:14 IST2017-03-12T02:14:07+5:302017-03-12T02:14:07+5:30

अन्वी मिर्झापूर शेतशिवारात विजेच्या जिवंत तारांना स्पर्श झाल्याने शेतक-याचा जागीच मृत्यू.

Electricity death due to electric shock! | विजेच्या धक्क्याने शेतक-याचा मृत्यू!

विजेच्या धक्क्याने शेतक-याचा मृत्यू!

बोरगाव मंजू, दि. ११- पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अन्वी मिर्झापूर शेतशिवारात विजेच्या जिवंत तारांना स्पर्श झाल्याने ५५ वर्षीय शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.
प्राप्त माहितीनुसार, अन्वी मिर्झापूर येथील रामदास किसन ठाकरे हे शनिवारी शेतात गेले होते. त्याच्या शेताशेजारी विद्युत रोहित्र आहे. या रोहित्राजवळ ठाकरे हे पाणी पिण्यासाठी गेले होते. दरम्यान, रोहित्राला ताण देण्यासाठी बांधलेल्या तारामध्ये वीज प्रवाह आला. त्या ताराला रामदास ठाकरे यांचा स्पर्श झाल्याने त्यांना जबर धक्का बसला. यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी ठाण्याचे ठाणेदार शेळके, पीएसआय पितळे, हे.काँ. गावंडे, पो.काँ. वाकोडे आदींनी घटनास्थळावर धाव घेतली. पुढील तपास ठाणेदार पी.के. काटकर करीत आहेत.

Web Title: Electricity death due to electric shock!