शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

अकोल्यात पाच हजारांपेक्षा अधिक थकबाकीचे १७ हजार वीजग्राहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 6:19 PM

७ हजारापेक्षा जास्त असे ग्राहक आहेत ज्यांच्याकडे वीजबिलाचे ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रूपयाची थकबाकी आहे.

अकोला: जिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या विद्युत ग्राहकांकडील थकबाकीचा डोंगर वाढला असून, वसुलीसाठी महावितरणला मोठीच कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राककांपैकी १७ हजारापेक्षा जास्त असे ग्राहक आहेत ज्यांच्याकडे वीजबिलाचे ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रूपयाची थकबाकी आहे. वसूलीसाठी आव्हान ठरणाऱ्या या थकबाकीमुळे ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित न करणाºया अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचा निर्णय परिमंडळ प्रशासनाने घेतला आहे.वाढत जाणाº्या थकबाकीमुळे जिल्हयाची वीज यंत्रणा कोलमडू नये आणि याचा फटका नियमित आणि वेळेवर वीज देयकांचा भरणा करणाºया ग्राहकांना बसू नये यासाठी मुख्य अभियंता अनिल डोये यांनी वसूलीचे कठोर पाऊले उचलत थेट कारवाईचा इशारा दिला आहे. जिल्हयाच्या घरगुती , वाणिज्यिक व औद्योगीक ग्राहकापैकी १७ हजार ६९९ ग्राहकाकडे प्रत्येकी ५ हजार रुपयांपेक्षा जास्त आणि एकून २६ कोटी ५९ लाख ७६ हजार रुपए वीजदेयकापोटी थकीत आहेत.यामध्ये अकोला ग्रामीण विभागातील ५ हजार ६३६ ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे ९ कोटी ७५ लाख ४३ हजार रुपए थकीत आहेत. अकोट विभागातील ४ हजार ३३७ ग्राहकांकडे ५ कोटी ५५ लक्ष ६७ हजार रुपए थकीत आहे. त्याच बरोबर अकोला शहर विभागातील ७ हजार ७२६ ग्राहकांकडे ११ कोटी २८ लाख ६६ हजार रूपयाची थकबाकी आहे.थकबाकी वसूलीसाठी मुख्य अभियंता यांनी सर्व कार्यकारी अभियंते आणि उपविभागीय अभियंते याच्या बैठकीत सर्वांना टार्गेट दिले होते. टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचाºयांकडे दोनच दिवस शिल्ल्क असल्याने जिल्हयातील महावितरणच्या तीनही विभागाचे अधिकारी व कर्मचारी वसूलीसाठी फिरत आहे. अभियंता पवनकुमार कछोटही अनेक ठिकाणी वसूली मोहिमेत सहभागी होत असून स्वत: कारवाई करत कर्मचाº्यांना वसूलीसाठी प्रोत्साहित करत आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण