विद्युत भवनातील लिफ्ट दुरुस्तीला मुहूर्त मिळेना

By Admin | Updated: June 2, 2017 19:37 IST2017-06-02T19:37:37+5:302017-06-02T19:37:37+5:30

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या येथील विद्युत भवन इमारतीमधील लिफ्ट गत दोन वर्षांपासून नादुरुस्त आहे.

Electric lighting elevators are available for repair | विद्युत भवनातील लिफ्ट दुरुस्तीला मुहूर्त मिळेना

विद्युत भवनातील लिफ्ट दुरुस्तीला मुहूर्त मिळेना



अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या येथील विद्युत भवन इमारतीमधील लिफ्ट गत दोन वर्षांपासून नादुरुस्त आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून, गत दोन वर्षांपासून लिफ्ट दुरुस्तीला मुहूर्त मिळत नसल्याने अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक रतनलाल प्लॉट भागात विद्युत भवन ही चार मजली इमारत आहे. या इमारतीत महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय आहे, तसेच महापारेषणचे कार्यालयही याच इमारतीत आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांचे मुख्यालय असल्याने या इमारतीमधील कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महावितरणचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, महापारेषणचे अधीक्षक अभियंता, महावितरणच्या अकोला शहर विभागाचे कार्यकारी अभियंता यांची कार्यालये या इमारतीत आहेत. सदर इमारतीत वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा आहे; परंतु ती गत दोन वर्षांपासून नादुरुस्तच आहे. त्यामुळे येथील अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पायऱ्या चढून वरच्या मजल्यांवर जावे लागते. सुविधेसाठी असलेली लिफ्ट नादुरुस्त झाली असली, तरी प्रशासन मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Electric lighting elevators are available for repair