शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ ची निवडणूक भाजपासाठी कठीण; काँग्रेसला आव्हानात्मक - कुमार केतकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:48 IST

२०१९ ची निवडणूक भाजपासाठी कठीण ठरणार आहे. सोबतच काँग्रेससाठी ती आव्हानात्मक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देशेतकरी जागर मंचच्यावतीने आयोजित व्याख्यानाच्या निमित्ताने ते अकोल्यात आले होते.लोकसभेत भाजपाच्या जागा या २०० ते १६० पर्यंत खाली येऊ शकतात, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले. पक्ष संघटना, लोकांचा विश्वास अशा अनेक पातळीवर काम करण्याचे आव्हान राहुल गांधी यांच्या समोर असल्याचे ते म्हणाले.

अकोला : विकासाचा बागुलबुवा उभा करून मोदींच्या नावावर निवडणूक जिंकलेल्या भाजपाची सर्व धोरणे निराशात्मक आहेत. सध्या देशातील वातावरण अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे. अशा स्थितीत भाजपाच्या विरोधात सर्व पक्षीय एकत्र येऊन निवडणूक लढतील, असे प्रयत्न होताना दिसत असले, तरी प्रत्यक्षात काही पक्षच एकत्र येऊन आघाडी स्थापन करतील, असे स्पष्ट करतानाच २०१९ ची निवडणूक भाजपासाठी कठीण ठरणार आहे. सोबतच काँग्रेससाठी ती आव्हानात्मक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केलेस्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकरी जागर मंचच्यावतीने आयोजित व्याख्यानाच्या निमित्ताने ते अकोल्यात आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार नाना पटोले उपस्थित होते. केतकर म्हणाले, की २०१९ ची निवडणूक भाजपासाठी सोपी नाही. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची गेल्या चार वर्षांत पूर्तता झालेली नाही. केवळ आश्वासने अन् घोषणा यापलीकडे सरकारचे कोणतेही काम दिसत नाही. विकास हा शब्द जणूकाही याच सरकारच्या काळात जन्माला आला, असा प्रपोगंडा निर्माण केला आहे. जीएसटीची अंमलबजावणी, नोटाबंदी अशा अनेक पातळीवर सरकार अपयशी ठरले असून, शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष आहे, व्यापारी नाराज आहेत. याचा फटका भाजपाला नक्कीच बसेल. लोकसभेत भाजपाच्या जागा या २०० ते १६० पर्यंत खाली येऊ शकतात, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले. पूर्ण बहुमतामध्ये भाजपा सरकार येणार नाही; मात्र सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. या पृष्ठभूमीवर काँग्रेसला आतापासूनच आपली ताकद वाढविण्याचे आव्हान आहे. पक्ष संघटना, लोकांचा विश्वास अशा अनेक पातळीवर काम करण्याचे आव्हान राहुल गांधी यांच्या समोर असल्याचे ते म्हणाले. महाराष्टÑ सरकारही दिल्लीच्या मर्जीवरच!राज्यात काँग्रेसची सत्ता असताना भाजपाने नेहमीच काँगे्रसचे सरकार हे हायकमांडच्या इशारावर चालते, अशी टीका केली. सध्याचे राज्यातील भाजपा सरकार हेसुद्धा वेगळे काय करीत आहे. मोदी-शहा यांनी हिरवी झेंडी दिल्याशिवाय एकही काम होत नाही. मुळातच हे सरकार स्वायत्त व सार्वभौम असल्याचे दिसत नाही. राज्यातही भाजपाची स्थिती कमकुवत आहे, त्यामुळे लोकसभा-विधानसभा निवडणुका सोबतच होतील, असेही केतकर म्हणाले.

 संघच भाजपाचा खरा चेहरा - पटोलेराष्टÑीय स्वयंसेवक संघाने नेहमीच आमचा भाजपाशी काही संबंध नाही, असे म्हटले आहे. प्रत्यक्षात संघच भाजपा चालवित आहे. भाजपाचा खरा चेहरा संघच आहे, असा आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला. भाजपा सरकार हे घोषणाबाज सरकार असून, येणाऱ्या काळात जनताच भाजपाला धडा शिकवेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाcongressकाँग्रेस