रानडुकराच्या हल्ल्यात वृद्ध जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST2021-05-18T04:19:38+5:302021-05-18T04:19:38+5:30

येथील तेलीपुरा परीसरात राहणारे विजय रामभाऊ गुल्हाने यांच्या हातगाव येथील शेतात ७० वर्षीय शेतमजूर विष्णू पांडुरंग भिंगारे काम करीत ...

Elderly man injured in bullfight | रानडुकराच्या हल्ल्यात वृद्ध जखमी

रानडुकराच्या हल्ल्यात वृद्ध जखमी

येथील तेलीपुरा परीसरात राहणारे विजय रामभाऊ गुल्हाने यांच्या हातगाव येथील शेतात ७० वर्षीय शेतमजूर विष्णू पांडुरंग भिंगारे काम करीत होते. सकाळी ७च्या दरम्यान त्यांच्यावर अचानक रानडुकराने हल्ला केला. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. शेतमालकाने त्यांना लगेच येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. औषधी अभावी तेथून त्यांना अकोल्याला हलविण्यात आले. अकोला सर्वोपचार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्या पायाला ३५ टाके पडले असून, सध्या ते स्वस्थ आहेत.

शेतमालक विजय गुल्हाने यांनी अकोला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली. पंचनामा करून योग्य ती मदत करण्याची मागणी सदर तक्रारीत करण्यात आली आहे.

Web Title: Elderly man injured in bullfight