रेल्वेतून कोसळल्याने वृद्ध गंभीर जखमी

By Admin | Updated: October 14, 2015 01:17 IST2015-10-14T01:17:33+5:302015-10-14T01:17:33+5:30

अकोला रेल्वे स्थानकावरील घटना.

Elderly injured due to collapsing in the train | रेल्वेतून कोसळल्याने वृद्ध गंभीर जखमी

रेल्वेतून कोसळल्याने वृद्ध गंभीर जखमी

अकोला: शेगावहून अकोला रेल्वे स्थानकावर आलेल्या एका रेल्वे गाडीतून प्लॅटफार्मवर उतरताना वृद्ध कोसळून जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. आगरनजीकच्या गोत्रा येथील रहिवासी देविदास सुखदेव आखरे (७२) हे शेगावहून अकोल्यात रेल्वेने आले होते. स्थानकात रेल्वे गाडी आल्यानंतर ते डब्याबाहेर पडत असताना त्यांचा तोल गेला व खाली कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, तातडीने सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र त्यानंतरही प्रकृतीत बिघाड झाल्याने आखरे यांना एका खासगी इस्पितळात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती धोकादायक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नवरात्रीनिमित्त आगर येथील देवीच्या मंदिरात भागवत सप्ताह सुरू होत असून, या सप्ताहासाठी देविदास आखरे हे आगरला जाण्यासाठी घाईत होते; मात्र रेल्वे स्थानकावर कोसळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Elderly injured due to collapsing in the train