शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आठवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आॅनलाइन मार्गदर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 15:25 IST

अकोला: विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना विषयानुरूप तंत्रस्नेही व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे

अकोला: विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना विषयानुरूप तंत्रस्नेही व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी इयत्ता पाचवी वआठवीतील विद्यार्थ्यांसाठी ‘ईझी अ‍ॅप’च्या माध्यमातून आॅनलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार येत्या नववर्षापासून आठवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. आॅनलाइन व्हिडिओद्वारे तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.शाळेत शिकताना विद्यार्थ्यांना विज्ञान, भाषा, गणित विषयासंबंधी अनेकदा अडचणी येतात. घरी असताना या अडचणी विद्यार्थ्यांना सोडविता येत नाही. पालकांनाही मुलांच्या शैक्षणिक अडचणी सोडविता येत नाहीत. विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन व्हावे, विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रश्नपत्रिका देऊन घरबसल्या परीक्षा देता यावी आणि पालकांनासुद्धा विद्यार्थ्यांचे गुण कळावे, यासाठी पुणे येथील अभिनव प्रा. लि. नामक कंपनीने ‘ईझी अ‍ॅप’ विकसित केले आहे. बहुतांश पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. पालकांनी ईझी अ‍ॅप मोबाइलमध्ये डाउनलोड करून घेतल्यावर विद्यार्थ्यांना आॅनलाइन मार्गदर्शन, प्रश्नसंच सहज उपलब्ध होतात. या ‘ईझी अ‍ॅप’च्या माध्यमातूनच आठवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षकांचे आॅनलाइन मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. तज्ज्ञ शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी काही व्हिडिओ उपलब्ध केले आहेत, तसेच दररोज रात्री ८ वाजता शिक्षक आॅनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. 

आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आॅनलाइन मार्गदर्शन १ जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी काही व्हिडिओ बनविण्यात आले आहेत. या व्हिडिओंच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना रात्री ८ वाजता आॅनलाइन मार्गदर्शन करतील.-प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी, माध्यमिक.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणonlineऑनलाइन