आणखी आठ जणांचा मृत्यू, २२० नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:53+5:302021-05-30T04:16:53+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅब कडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,५९४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, ...

Eight more died, 220 newly positive | आणखी आठ जणांचा मृत्यू, २२० नव्याने पॉझिटिव्ह

आणखी आठ जणांचा मृत्यू, २२० नव्याने पॉझिटिव्ह

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅब कडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,५९४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,४४९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये पिंजर ता. बार्शीटाकळी येथील सहा महिन्याची बालिका, देवर्डा ता. अकोट येथील ७५ वर्षीय पुरुष, पातूर येथील ५५ वर्षीय महिला, अकोलखेड ता. अकोट येथील ७० वर्षीय महिला, कार्ला ता. पातूर येथील ६२ वर्षीय पुरुष, सकनी ता. बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय पुरुष, वाई ता. मूर्तिजापूर येथील ६१ वर्षीय महिला व

सांगवी ता.तेल्हारा येथील ६२ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या

मूर्तिजापूर- १८, अकोट-१७, बाळापूर-१२, बार्शीटाकळी- ६, पातूर- १३, तेल्हारा- १६ अकोला- ६३. (अकोला ग्रामीण-१८, अकोला मनपा क्षेत्र-४५)

४७८ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, खासगी कोविड रुग्णालयांमधील ३८ व होम आयसोलेशनमधील ४२५ अशा एकूण ४७८ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.

४,८६१ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५५,२८२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४९,३५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,०६४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,२९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Eight more died, 220 newly positive