बँक खाते क्रमांकात अडकली आठ कोटींची मदत

By Admin | Updated: June 30, 2014 01:52 IST2014-06-30T00:43:51+5:302014-06-30T01:52:56+5:30

अकोला जिल्हय़ातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा.

Eight Crores Stuck In Bank Account Number | बँक खाते क्रमांकात अडकली आठ कोटींची मदत

बँक खाते क्रमांकात अडकली आठ कोटींची मदत

अकोला : गारपिटीमुळे पीक नुकसान भरपाईपोटी जिल्हय़ातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी प्राप्त झालेल्या ५७ कोटीपैकी ४९ कोटींची मदत वाटप करण्यात आली असली तरी, उर्वरित ८ कोटींच्या मदत वाटपाचे काम बाकी आहे. संबंधित गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध झाले नसल्याने या मदतीचे वाटप अडकले आहे. मदती पासून वंचित असलेल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांकडून या मदतीची प्रतीक्षा केली जा त आहे.
गेल्या २२ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्हय़ात हजारो हेक्टरवरील गहू, हरभरा, संत्रा, लिंबू व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ५0 टक्क्याच्यावर पिकांचे नुकसान झालेल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी राज्य शासनामार्फत मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. या पॅकेज अंतर्गत जिल्हय़ातील पीक नुकसान भर पाईपोटी जिल्हय़ातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनामार्फत गेल्या मार्चअखेर ५७ कोटींचा मदत निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. जिल्हय़ातील सातही तहसीलस्तरावर वितरित करण्यात आलेल्या मदतनिधीतून, गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्यानुसार सातही तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम करण्यात आले. त्यामध्ये एकूण ५७ कोटींच्या मदतनिधीपैकी गेल्या दोन महिन्यात ४९ कोटींची मदत गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून, उर्वरित ८ कोटींची मदत वाटप करणे अद्याप बाकी असल्याची स्थिती आहे. संबंधित गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक तलाठी आणि तहसील कार्यालयाकडे उपलब्ध झाले नसल्याने, मदतीची रक्कम उपलब्ध असूनही, मद तीची रक्कम गारपीटग्रस्त संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात करण्यात आली नाही. परिणामी बँक खाते क्रमांकात जिल्हय़ात गारपीटग्रस्त शे तकर्‍यांना ८ कोटींची मदत अडकली आहे. या प्रकारात मात्र मदतीच्या लाभा पासून वंचित असलेल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांकडून गारपिटीची मदत केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी जिल्हय़ातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी उपलब्ध झालेल्या ५७ कोटींच्या मदतनिधीपैकी ४९ कोटींची मदत गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहीती दिली. काही गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध झाले नसल्याने, उर्वरित आठ कोटींची मदत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी संबंधित शेतकर्‍यांनी त्यांचा बँक खाते क्रमांक संबंधित तलाठी किंवा तहसील कार्यालयाकडे द्यावा अशी सुचना त्यांनी केली.

**शेतकर्‍यांच्या याद्या चावडीवर लावण्याच्या सूचना!
गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या यादीमध्ये नाव आहे; मात्र बँक खाते क्रमांक नमूद नाही, अशा गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या ग्रामपंचायत चावडीवर लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हय़ातील तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बँक खाते क्रमांक नसलेल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या सोमवारी लावण्यात येणार आहेत.

Web Title: Eight Crores Stuck In Bank Account Number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.