आठ गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार
By Admin | Updated: September 7, 2014 01:47 IST2014-09-07T01:47:30+5:302014-09-07T01:47:30+5:30
अकोला शहरातील आठ गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडी पार करण्यात आले आहे.

आठ गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार
अकोला : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील आठ गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) प्रा. संजय खडसे यांनी दिला. त्यामध्ये पाच गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी आणि तीन गुन्हेगारांना तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले असून, याबाबतचा आदेश शनिवारी निर्गमित करण्यात आला.