हाणामारीतील आठ आरोपींची सुटका, तिघे कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST2021-05-28T04:15:19+5:302021-05-28T04:15:19+5:30

तालुक्यातील जाफ्रापूर येथे परस्परविरोधी तक्रारींवरून दाखल गुन्ह्यात अटक केलेल्या ११ आरोपींना २७ मे रोजी तेल्हारा न्यायालयात हजर केले. एका ...

Eight accused released in riots, three jailed | हाणामारीतील आठ आरोपींची सुटका, तिघे कारागृहात

हाणामारीतील आठ आरोपींची सुटका, तिघे कारागृहात

तालुक्यातील जाफ्रापूर येथे परस्परविरोधी तक्रारींवरून दाखल गुन्ह्यात अटक केलेल्या ११ आरोपींना २७ मे रोजी तेल्हारा न्यायालयात हजर केले. एका गुन्ह्यातील तीन आरोपींना जिल्हा कारागृहात पाठविण्याचा आदेश न्यायालयाने दिला तर दुसऱ्या गुन्ह्यातील आठ आरोपींना जामिनावर सोडण्यात आले.

फिर्यादी ३० वर्षीय मजूर महिलेच्या तक्रारीनुसार १६ मे रोजी ११ आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जाफ्रापूर येथील गुन्ह्यातील आरोपी नितीन मुकिंदा बोदडे, महेश मुकिंदा बोदडे, मुकिंदा बोदडे या अटकेतील आरोपींची न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेतील आरोपी प्रवीण बोदडे, गणपत बोदडे, रामेश्वर बोदडे, जसपाल बोदडे, परमेश्वर बोदडे, धम्मपाल बोदडे, संतोष बोदडे, संघपाल बोदडे यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

Web Title: Eight accused released in riots, three jailed