तगड्या पाेलीस बंदाेबस्तात ईद शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST2021-07-22T04:13:36+5:302021-07-22T04:13:36+5:30
पाेलीस अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या अकाेला : अकाेला जिल्ह्यात तसेच अमरावती परिक्षेत्रात कार्यकाळ पूर्ण झालेल्या पाेलीस अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या करण्यात ...

तगड्या पाेलीस बंदाेबस्तात ईद शांततेत
पाेलीस अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या
अकाेला : अकाेला जिल्ह्यात तसेच अमरावती परिक्षेत्रात कार्यकाळ पूर्ण झालेल्या पाेलीस अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती आहे़ बरेच अधिकारी अकाेल्यात येण्यास उत्सुक असून अकाेल्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनीही येथेच काही काळ राहणे पसंत केले आहे़ काेराेनाचा काळ असल्याने एखादे वर्ष याच ठिकाणी ठेवावे, अशी विनंती अमरावती परिक्षेत्रातील पाेलीस अधिकाऱ्यांनी केली आहे़
गुरेचाेर गजाआड
अकाेला : एमआयडीसी पाेलिसांनी गुरे चाेरणाऱ्या एका अट्टल चाेरट्यास अटक केली आहे़ त्याने चाेरलेली गुरे पाेलिसांनी मूळ मालकांच्या ताब्यात दिली आहेत़ शिवर येथून गुरे चाेरल्याची तक्रार पाेलीस ठाण्यात देण्यात आली हाेती़ त्यानंतर पाेलिसांनी तपास करून गुरे चाेरट्यास अटक करून त्याच्याकडून गुरे ताब्यात घेतली़ त्यानंतर ही गुरे मूळ मालकांना परत केली आहेत़