शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

गावंडगाव येथे विहिरीत पडलेल्या वहिनीला वाचविण्याच्या प्रयत्ना जेठाचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:31 IST

आलेगाव (अकोला): विहिरीत पडलेल्या वहिनीला वाचविण्याच्या प्रयत्नात जेठाचाही मृत्यू झाल्याची घटना चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या गावंडगाव येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. दोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

ठळक मुद्देचान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील गावंडगाव येथील घटनादोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव (अकोला): विहिरीत पडलेल्या वहिनीला वाचविण्याच्या प्रयत्नात जेठाचाही मृत्यू झाल्याची घटना चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या गावंडगाव येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. दोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. गावंडगाव येथील निर्मला हुकूमचंद जाधव (३५) या गावंडगाव शेत शिवारातील शेतात बैल चारण्यासाठी गेल्या होत्या. बैल चरत असताना अचानक एका बैलाने निर्मला यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यापासून वाचण्याचा प्रयत्न करीत असताना निर्मला जाधव या  शेतातील विहिरीत पडल्या. ही घटना शेतात उपस्थित असलेले निर्मलाचे जेठ वसराम जाधव यांच्या लक्षात येताच, त्यांनी निर्मलाला वाचविण्याकरिता विहिरीत उडी घेतली. विहिरीत पाणी जास्त असल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्‍वर पुरी, चान्नीचे प्रभारी ठाणेदार मुकुंद वाघमोडे, मंडळ अधिकारी विजय राठोड, हेपोका अदिनाथ गाठेकर, देवेंद्र चव्हाण, मोहन ढवळे, अमोल कांबळे, देवेंद्र बाभूल, शेखर कोंद्रे यांनी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी चान्नी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोघांचेही  मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथे पाठवण्यात आले. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAccidentअपघातDeathमृत्यू