शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खराब गहू गरीब लाभार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 07:53 IST

वखारने केले हात वर: गव्हाची उचल थांबविली

अकोला : केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातील भिजलेला, कीडग्रस्त, प्रमाणापेक्षा अधिक आर्द्रता असलेला खराब गहू अखेर गरीब लाभार्थींच्या माथी मारण्याचा प्रकार निवडणुकीच्या धामधुमीत सुरू झाला आहे. बुधवारी पातूर, बाळापूर तालुक्याच्या गोदामांत प्राप्त पोत्यांत काही खराब गव्हाची पोती आढळली. गोदामपालांनी माहिती देताच जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. वानखेडे यांनी बाळापुरात धाव घेतली. सोबत गहू परत घेण्याचे वखार व्यवस्थापनाला कळविले; मात्र वखारने हात झटकल्याने दुपारनंतर गोदामातून गव्हाची उचल थांबवावी लागली.

‘एफसीआय’ने राज्य शासनाला धान्याचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम भाड्याने घेतले. अकोला कृषी उत्पन्न बाजार परिसरातील दोन गोदामात गव्हाचा साठा करण्यात आला. ४ ते ६ मार्च २०१९ दरम्यान, पोत्यांमधील गहू खराब असल्याचे वखार महामंडळाच्या वरिष्ठ गोदाम व्यवस्थापकांच्या लक्षात आले. त्यांनी थेट एफसीआय भोपाळ, नागपूर प्रादेशिक कार्यालय, केंद्रीय वखार महामंडळाच्या मुंबईतील वरिष्ठांना ही बाब कळविली. त्यांच्या तक्रारीनुसार १५ मार्च रोजी एफसीआय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पी. के. बिहारी यांनी अकोला गोदामात भेट दिली.खातरजमा न केल्याने गोंधळवरिष्ठ गोदाम व्यवस्थापकांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी न झाल्याने गोदामातील खराब गव्हाची माहिती पुढे आली नाही. तरीही एफसीआय व्यवस्थापक किशोरीलाल यांनी गव्हाची उचल करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार उचल सुरू झाली. पण संपूर्ण गव्हाची खातरजमा न झाल्याने तेथेच गोंधळ झाला. तोच खराब गहू काही प्रमाणात वाहनांत टाकून लाभार्थींच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बुधवारी उघड झाले.

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtraमहाराष्ट्र