शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत साडेपाच हजारांवर शिक्षकांना ‘जीपीएफ’ पावत्या  दिल्याचा शिक्षण विभागाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 14:09 IST

 अकोला : शिक्षण विभागातील वेतन पथकाने शाळा स्तरावर ५ हजार ६४२ शिक्षकांना दोन वर्षांच्या जीपीएफ पावत्या दिल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देगत तीन वर्षांपासून जीपीएफच्या पावत्याच मिळत नसल्याची तक्रार शिक्षकांनी मांडली आहे. खातेदार असलेल्या ३ हजार ७१४ शिक्षकांपैकी ३ हजार २६४ शिक्षकांना शाळा स्तरावर जीपीएफच्या पावत्यांचे वितरण करण्यात आलेआता केवळ २0१७-१८ या वर्षाच्या जीपीएफच्या पावत्या शिक्षकांना वितरित करावयाचे काम बाकी आहे.

नितीन गव्हाळे

 अकोला : जिल्ह्यातील सर्वच शाळांमधील शिक्षकांना दरवर्षी नियमित जीपीएफची पावती मिळायला हवी; परंतु माध्यमिक शिक्षण विभागाकडून शिक्षकांना गत तीन वर्षांपासूनच्या जीपीएफच्या पावत्या दिल्या जात नसल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त होत आहेत. परंतु, शिक्षण विभागातील वेतन पथकाने शाळा स्तरावर ५ हजार ६४२ शिक्षकांना दोन वर्षांच्या जीपीएफ पावत्या दिल्याचा दावा केला आहे.शाळांमधील शिक्षकांना दरवर्षी नियमितपणे जीपीएफच्या पावत्या मिळायच्या. या पावत्यांच्या आधारे जीपीएफची किती रक्कम मिळाली, किती जमा झाली, याची माहिती शिक्षकांना मिळत असते; परंतु गत तीन वर्षांपासून जीपीएफच्या पावत्याच मिळत नसल्याची तक्रार शिक्षकांनी मांडली आहे. शिक्षकांनी २0१४-१५, २0१५-१६, २0१६-१७ या तीन वर्षांच्या जीपीएफच्या पावत्या माध्यमिक शिक्षक विभागाकडून मिळायला हव्या होत्या; परंतु या पावत्या शेकडो शिक्षकांना मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाकडे चौकशी केल्यावर, त्यांनी २0१४-१५ मध्ये जीपीएफ खातेदार असलेल्या ३ हजार ७१४ शिक्षकांपैकी ३ हजार २६४ शिक्षकांना शाळा स्तरावर जीपीएफच्या पावत्यांचे वितरण करण्यात आले. तसेच २0१५-१६ मध्ये ३ हजार ५0७ शिक्षकांपैकी २ हजार ३७८ शिक्षकांना जीपीएफची पावती देण्यात आल्याची माहिती दिली. आता केवळ २0१७-१८ या वर्षाच्या जीपीएफच्या पावत्या शिक्षकांना वितरित करावयाचे काम बाकी आहे. तेही लवकरच पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)दोन वर्षांच्या जीपीएफच्या पावत्या शिक्षकांना शाळा स्तरावर देण्यात आल्या आहेत. एकूण ७२२१ शिक्षकांपैकी ५६४२ शिक्षकांना जीपीएफच्या पावत्यांचे वितरण करण्यात आले. २0१७-१८ या वर्षातील जीपीएफच्या पावत्या वितरित करायच्या आहेत.मनोहर तराळे, प्रभारी वेतन अधीक्षकमाध्यमिक शिक्षण विभाग

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिकTeacherशिक्षक