शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपुरक होळीसाठी हवा सर्वांचाच पुढाकार

By admin | Updated: March 5, 2015 01:56 IST

परिचर्चेतील सूर; वृक्षतोड रोखण्यासाठी प्रयत्न हवे.

अकोला : होळी साजरी करताना वृक्षांची बेसुमार कत्तल केली जाते. ही वृक्षतोड रोखण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरणपूरक होळी साजरी करूया, लाकूड आणि गोवर्‍यांऐवजी परिसरातील कचरा जाळूया, होळीत टाकण्यात येतो. यातून पर्यावरणाचा र्‍हास होतो. निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी पर्यावरण पुरक होळी साजरी करणे आवश्यक असून त्यासाठी सर्वांचाच पुढाकार असणे आवश्यक असल्याचा सूर बुधवार, ४ मार्च रोजी लोकमत शहर कार्यालयात आयोजित परिचर्चेत उमटला. ह्यपर्यावरण पूरक होळी..ह्ण या विषयावर पार पडलेल्या परिचर्चेत अकोला वन्यजीव विभागाचे गोविंद पांडे, अकोलेकरांना वेळोवेळी पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार्‍या निसर्ग कट्टय़ाचे गौरव झटाले, वन्यजीव आणि पर्यावरण व संवर्धन संस्थेचे प्रतिनिधी शिशिर शेंडोकार, स्वावलंबी विद्यालयातील विद्यार्थ्यांंना पर्यावरणाचे धडे देणारे राष्ट्रीय हरित सेनेचे मास्टर ट्रेनर हरीश शर्मा सहभागी झाले होते. पारंपरिक पद्धतीने होळीत आपण ज्याचा इंधन म्हणून वापर करतो, ती लाकडे व उत्तम प्रकारचे शेणखत असलेल्या गोवर्‍या जाळण्यात येतात. इंधनासाठी वृक्षांची होणारी कत्तल, हिरवे वृक्ष तोडले जातात. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो. ते थांबविण्यासाठी होळीत लाकडे न जाळता घरासमोरील वा परिसरातील केरकचरा, जळाऊ पदार्थ याची होळी केल्यास परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच पर्यावरणाचे संतुलन राखण्यात हातभार लागेल. तसेच होळीत पुरणपोळीचा नैवेद्य टाकून उच्च दर्जाचे पोषणमूल्ये असलेले अन्न वाया न घालवता ते आापल्या परिसरातील गोरगरीब, भिकारी, अनाथ, गरजू लोकांना तसेच पशुपक्षी व प्राण्यांना देण्यात यावे आणि दुर्गुणांचे दहन करून सद्गुणांचा अंगीकार करण्याची प्रतिज्ञा घ्यावी, असे असे कळवळीचे आवाहन यावेळी परिचर्चेत सहभागी झालेल्या मान्यवरांनी अकोलेकरांना केले.