पर्यावरणपुरक होळीसाठी हवा सर्वांचाच पुढाकार

By Admin | Updated: March 5, 2015 01:56 IST2015-03-05T01:56:47+5:302015-03-05T01:56:47+5:30

परिचर्चेतील सूर; वृक्षतोड रोखण्यासाठी प्रयत्न हवे.

Eco-friendly initiatives for Holi | पर्यावरणपुरक होळीसाठी हवा सर्वांचाच पुढाकार

पर्यावरणपुरक होळीसाठी हवा सर्वांचाच पुढाकार

अकोला : होळी साजरी करताना वृक्षांची बेसुमार कत्तल केली जाते. ही वृक्षतोड रोखण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरणपूरक होळी साजरी करूया, लाकूड आणि गोवर्‍यांऐवजी परिसरातील कचरा जाळूया, होळीत टाकण्यात येतो. यातून पर्यावरणाचा र्‍हास होतो. निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी पर्यावरण पुरक होळी साजरी करणे आवश्यक असून त्यासाठी सर्वांचाच पुढाकार असणे आवश्यक असल्याचा सूर बुधवार, ४ मार्च रोजी लोकमत शहर कार्यालयात आयोजित परिचर्चेत उमटला.
ह्यपर्यावरण पूरक होळी..ह्ण या विषयावर पार पडलेल्या परिचर्चेत अकोला वन्यजीव विभागाचे गोविंद पांडे, अकोलेकरांना वेळोवेळी पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार्‍या निसर्ग कट्टय़ाचे गौरव झटाले, वन्यजीव आणि पर्यावरण व संवर्धन संस्थेचे प्रतिनिधी शिशिर शेंडोकार, स्वावलंबी विद्यालयातील विद्यार्थ्यांंना पर्यावरणाचे धडे देणारे राष्ट्रीय हरित सेनेचे मास्टर ट्रेनर हरीश शर्मा सहभागी झाले होते. पारंपरिक पद्धतीने होळीत आपण ज्याचा इंधन म्हणून वापर करतो, ती लाकडे व उत्तम प्रकारचे शेणखत असलेल्या गोवर्‍या जाळण्यात येतात. इंधनासाठी वृक्षांची होणारी कत्तल, हिरवे वृक्ष तोडले जातात. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो. ते थांबविण्यासाठी होळीत लाकडे न जाळता घरासमोरील वा परिसरातील केरकचरा, जळाऊ पदार्थ याची होळी केल्यास परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच पर्यावरणाचे संतुलन राखण्यात हातभार लागेल. तसेच होळीत पुरणपोळीचा नैवेद्य टाकून उच्च दर्जाचे पोषणमूल्ये असलेले अन्न वाया न घालवता ते आापल्या परिसरातील गोरगरीब, भिकारी, अनाथ, गरजू लोकांना तसेच पशुपक्षी व प्राण्यांना देण्यात यावे आणि दुर्गुणांचे दहन करून सद्गुणांचा अंगीकार करण्याची प्रतिज्ञा घ्यावी, असे असे कळवळीचे आवाहन यावेळी परिचर्चेत सहभागी झालेल्या मान्यवरांनी अकोलेकरांना केले.

Web Title: Eco-friendly initiatives for Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.