शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

‘एसीबी’च्या कारवाईला संशयाचे ‘ग्रहण’; मूर्तिजापूर पोलीस ठाण्यातील प्रकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 1:04 AM

अकोला : मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्हय़ातील आरोपीला सहकार्य करण्यासाठी तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात केलेल्या कारवाईला संशयाचे ‘ग्रहण’ लागल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देवरिष्ठ अधिकारी व कर्मचारी जाळय़ातून सुटले

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्हय़ातील आरोपीला सहकार्य करण्यासाठी तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात केलेल्या कारवाईला संशयाचे ‘ग्रहण’ लागल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. तक्रारीमध्ये ठाणेदार व एका कर्मचार्‍याच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे.त्यामुळे एसीबीचे अधिकारी २४ जानेवारी रोजी ठाणेदारची पडताळणी करण्यासाठी गेले मात्र ते भेटले नाहीत. याच कारणावरून त्यांना सोईस्कररीत्या या जाळय़ातून सोडल्याचे वास्तव समोर आले आहे.मूर्तिजापूर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने शिक्षण संस्थाचालकाच्या मुलावर बलात्काराचा आरोप केला होता. यावरून मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पीएसआय अश्‍विनी गायकवाड यांच्याकडे देण्यात आला. आरोपीला तपासात सहकार्य करण्यासाठी तसेच आरोपीला लाभ मिळेल, या दिशेने दस्तऐवज तयार करण्यासाठी अँड. सचिन वानखडे याच्या माध्यमातून तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागण्यात आली.  मात्र, तक्रारकर्त्याला लाच देणे नसल्याने त्यांनी सदर प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली.  सोमवारी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी मूर्तिजापूर गाठून आरोपी अश्‍विनी गायकवाड, गणेश कोथळकर व अँड. सचिन वानखडे या तिघांना ताब्यात घेतले. मात्र, महिला अधिकारी असल्याने त्यांना सायंकाळी अटक न करण्याचे कारण सांगत तीनही आरोपींना समजपत्र देऊन सोडण्यात आले. आरोपींना मंगळवारी हजर राहण्याचे सांगण्यात आले, मात्र एकही आरोपी हजर न झाल्याने एसीबीच्या या कारवाईला ग्रहण लागल्याचे निश्‍चित झाले असून, अकोला एसीबीच्या कार्यकाळात हा प्रकार प्रथमच घडल्याची चर्चा जोरात आहे.

पोलीस खात्याची प्रतिमा मलिन मात्र कारवाई नाही!मूर्तिजापूर पोलीस ठाण्यातील दोन पीएसआयसह एक अधिकारी व एका कर्मचार्‍याचा या लाच प्रकरणात थेट संबंध येत असल्याची चर्चा जोरात आहे. या प्रकारामुळे अकोला पोलिसांची प्रतिमा मलिन झाली, मात्र त्यानंतरही हे प्रकरण ‘सेट’ झाल्याचे सांगण्यात येत असून, अधिकारी व कर्मचारी ठाण्यात काही घडलेच नसल्याच्या तोर्‍यात वागत असल्याची माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडूनच आता लाचखोरांची पाठराखण केली जाते काय? असा सवाल खात्यातील प्रामाणिक अधिकारी व कर्मचार्‍यांकडून करण्यात येत आहे.

..तर हा भेदभाव का?पाच वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या प्रकरणात अटक न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र, आजपर्यंत अकोला एसीबीने अशाप्रकारे एकाही आरोपीला समजपत्र देऊन सोडले नाही. मग, या बड्या पोलीस अधिकार्‍यांना हा लाभ देण्यामागे नेमके काय कारण आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अकोला एसीबीच्या अधिकार्‍यांशी वारंवार संपर्क केल्यानंतरही त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांच्या या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कारवाईत भेदभाव केल्याचे स्पष्ट होत आहे.

पुरावे मिळाल्यानंतर गुन्हा दाखलची घिसाडघाई‘एसीबी’च्या पडताळणीमध्ये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले, मात्र त्यानंतर रंगेहाथ अटक करण्यासाठी आणखी दोन ते तीन वेळा पडताळणी केली असती, तर मोठे अधिकारीही ‘एसीबी’च्या जाळयात अडकले असते. मात्र, पुरावे हातात आल्यानंतरही ‘एसीबी’च्या अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी घाई केल्याची चर्चा पोलीस खात्यात सुरू आहे. एका अधिकार्‍याची पडताळणी करण्यासाठी गेल्यानंतर संबंधित अधिकारी अकोला तसेच बाहेर असल्यामुळे पडताळणी पूर्ण केल्याचे सांगत एसीबीने या अधिकार्‍याला क्लीन चिट दिल्याचा प्रकारही संशयास्पद असल्याचे बोलल्या जात आहे. 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरPoliceपोलिस