E-Nam scheme can increase unemployment! | ई-नाम योजनेमुळे बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता!
ई-नाम योजनेमुळे बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता!

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : नुकतीच भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करून ई - नाम या व्यवहार पद्धतीचा वापर करण्याचे ठरविले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढ होण्याची शक्यता असल्याचा धोका खामगाव येथे पार पडलेल्या शेतकरी, व्यापारी व हमाल यांच्या संयुक्त चर्चासत्रात निघाला. हे चर्चासत्र येथील बाजार समितीत पार पडले.
शेतमाल विक्री व्यवस्थेमधील पारंपरिक पद्धती बंद करून संगणिकृत आणि आॅनलाईन लिलावाद्वारे व्यवहार केले तर त्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचे व्यवहार पारदर्शक राहतील का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी उपस्थित केले. शेतकºयांच्या फायद्याची योजना असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो. ई - नाम योजना लागू करायची असेल तर ती स्वतंत्र सुरू करावी त्या करीत बाजार समिती बरखास्त कशाला. हे तर असे झाले की, घरात खटमल झाले म्हणजे घरच जाळून टाकण्याचा प्रकार झाला असा आरोपही फाटे यांनी केला.
व्यापारी संघटनेच्या वतीने विवेक मोहत यांनी सदर ई - नाम व्यापारामध्ये व्यापार करण्याचे प्रशिक्षण शेतकरी व व्यापारी वगार्ला देने गरजेचे असून ती योजना शेतकरी, व्यापारी व हमाल यांच्या करिता फायद्याची की तोट्याची ह्याबाबत पूर्ण माहिती जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत कुठलाच अंदाज कोणीही काढू शकत नाही. शेतमालामध्ये जो पर्यंत ग्रेडिंग होत नाही किंवा नमुना हातात घेऊन डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत शेतकºयांना योग्य भाव देता येत नाही. त्यामुळे आॅनलाईन खरेदीमध्ये फसगत होण्याचा धोका अधिक आहे, अशी शंकाही अनेकांनी उपस्थित केली.
(प्रतिनिधी)

Web Title: E-Nam scheme can increase unemployment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.