तुदगाव येथे विहिरीत पडून इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2017 20:21 IST2017-07-11T20:21:07+5:302017-07-11T20:21:07+5:30
तेल्हारा : नजीकच्या तुदगाव येथे १० जुलै रोजी रात्री कोरड्या विहिरीत पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

तुदगाव येथे विहिरीत पडून इसमाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : नजीकच्या तुदगाव येथे १० जुलै रोजी रात्री कोरड्या विहिरीत पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
तुदगाव येथील विठ्ठल नामदेव बनकर (४०) हे मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले. १० जुलै रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ते कोरड्या विहिरीत पडल्यामुळे जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. अशी फिर्याद बाळकृष्ण शंकर बनकर यांनी तेल्हारा पोलिसांत दिली. या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.