धूळ वादळाने झाकला व-हाड!
By Admin | Updated: April 7, 2015 01:59 IST2015-04-07T01:59:38+5:302015-04-07T01:59:38+5:30
सोमवार सकाळपासून व-हाडात धूळ वादळाचा प्रभाव; उन्हाळी पिके, फळबागावर परिनाम होण्याची शक्यता.

धूळ वादळाने झाकला व-हाड!
अकोला - नैसर्गिक आपत्तीने अगोदरच विदर्भातील शेतकरी गलितगात्र झाला असताना पुन्हा धूळ वादळाचे नवे संकट निर्माण झाले आहे. सोमवार सकाळपासून वर्हाडातील जिलत या धूळ वादळाचा प्रभाव जाणवू लागला असून, या धुळीचा परिणाम फळबाग, उन्हाळी पिके आणि मानवी आरोग्यावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. दरम्यान पूणे येथील ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अरब, आखाती देशातून हे धूळ वादळ वार्याच्या दिशेने या राज्यात आले असून, अकोला, अहमदनगर, पुणे, नाशिक आदींसह अनेक भागात याचा प्रभाव असल्याचे स्पष्ट केले. यामुळे उन्हाळी पिके, फळबागा, भाजीपाला पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मानवासह पक्ष्यांवरदेखील याचा परिणाम होऊ शकतो. *अकोला जिल्हा झाकला सोमवार सकाळपासून या वादळाने जिल्हा झाकला आहे. सुरुवातीला पहाटे हे दव असावे, अशी चर्चा होती, तथापि हे दव ८ वाजले तरी जात नसल्याने शेतकर्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली.