शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात ३२ रुग्ण वाढले; ८१ जण कोरोनामुक्त झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 20:14 IST

एकूण ३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३२०९ वर गेली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे सत्र सुरूच असून, शुक्रवार, १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २५, तर रॅपिड चाचण्यांमध्ये आठ असे एकूण ३२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३,२०८ वर गेली आहे. दरम्यान, ८१ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी दिवसभरात ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे २३८ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालेल्या २५ जणांमध्ये आठ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील सहा जणांसह, अकोल्यातील केळकर रुग्णालय व बार्शीटाकळी शहरातील प्रत्येकी तीन जण, पातूर येथील तीन जण, अकोट येथील दोन जण, अकोट तालुक्यातील चंडिकापूर, अकोला तालुक्यातील पाळोदी, मूर्तिजापूर, अकोला शहरातील शिवसेना वसाहत, खदान, कौलखेड, बालाजी नगर व खांबोरा येथील प्रत्येकी एक अशा एकूण २५ रुग्णांचा समावेश आहे. 

‘रॅपिड’ चाचण्यांमध्ये ७ पॉझिटिव्ह दिवसभरात झालेल्या १८१ रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्यांमध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अकोला मनपा क्षेत्रात तीन तर अकोट येथे चार असे सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अकोला ग्रामीण, बाळापूर, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाहीत. आतापर्यंत १०,३८२ चाचण्यांमध्ये ५२३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

८१ जणांना डिस्चार्जशुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३०, कोविड केअर सेंटर येथून २६, उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथून १२, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रेजेन्सी येथून एक, कोविड केअर सेंटर अकोट येथून १० अशा एकूण ८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४७८ जणांवर उपचार सुरूजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,२०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २,५९९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४७८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला