शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

कोरोना काळात लहान मुले झाली ‘मोटू’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 10:26 IST

During the Corona period, children became 'fat' : इनडोअर गेम्स आणि मोबाइलचा वाढता वापर यामुळे मुले एकाच ठिकाणी बसून राहण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देइनडोअर गेम्स आणि मोबाइलचा वापर वाढला मुलांमधील स्थूलता वाढली
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून शाळा बंद आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे मुलांचे मैदानी खेळही बंद झाले आहेत. त्यामुळे इनडोअर गेम्स आणि मोबाइलचा वाढता वापर यामुळे मुले एकाच ठिकाणी बसून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, मुलांमधील स्थूलपणा वाढल्याने कोरोना काळात लहान मुले ‘मोटू’ झाल्याचे निदर्शनास येत आहे. मागील वर्षभरापेक्षा जास्त काळापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आला. तेव्हापासूनच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शिवाय, लॉकडाऊनमुळे लहान मुलांचे मैदानी खेळही बंद झाले. परिणामी, या मुलांचा कल इनडोअर गेम्सकडे वाढला आहे. या काळात मुलांचा अभ्यासही मोबाइलवरच होऊ लागल्याने त्यांचा स्क्रीन टाइमदेखील वाढला. अभ्यासासोबतच मुले मोबाइलवर कार्टून्स आणि व्हिडिओ गेम्सच्या जास्त आहारी गेल्याने मुलांमध्ये एकाच ठिकाणी बसून राहण्याचे प्रमाणही वाढले. मात्र त्याचे विपरीत परिणाम आता दिसू लागले आहेत. अनेक कुटुंबातील लहान मुलांमध्ये स्थूलपणाची समस्या उद्भवू लागली आहे. मुलांचे वजन वाढू लागल्याने त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.वजन वाढले, कारण...कारोना काळात मैदानी खेळ खेळणे बंद झाले आहे. त्यामुळे मुलांचा शारीरिक व्यायाम बंद झाला.इनडोअर गेम्स प्रामुख्याने बैठे खेळ असतात. त्यामुळे त्यांच्या शरीराची कुठल्याच प्रकारची हालचाल होत नाही.शिवाय, मोबाइलवरील स्क्रीन टाइम वाढल्यानेही एकाच जागी बसून राहण्याचे प्रमाण वाढले. परिणामी, स्थूलपणा वाढला.खानपानाचेही गणित बिघडल्याने वजन वाढण्याची समस्या उद्भवत असल्याचे चित्र आहे.वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजीसध्या काेरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. अशा परिस्थितीत आवश्यक सुरक्षा साधणांचा वापर करून मुलांचा व्यायाम होईल, असे खेळ खेळणे आवश्यक आहे. (उदा. बॅडमिंटन)मोबाइलवरील व्हिडिओ गेम्स आणि कार्टून व्हिडिओ बघण्याचा कालावधी कमी करणे आवश्यक आहे. परिणामी, मुले एकाच जागी जास्त काळ बसून राहणार नाहीत.या सर्व बाबींसोबतच मुलांच्या खानपानाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मुलांना पौष्टिक आहार दिल्यास त्यांचे आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होईल.लहान मुलांचे डॉक्टर म्हणतात...कोरोनाच्या काळात मुलांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. परिणामी, बहुतांश मुले एकाच जागी बसून राहत असल्याने त्यांच्या शरीराला आवश्यक व्यायाम मिळत नाही. परिणामी, मुलांमध्ये काही प्रमाणात स्थूलपणाच्या समस्या दिसून येत आहेत. पालकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.- डॉ. विनीत वरठे, बालरोग तज्ज्ञ, जीएमसी, अकोलामुले टीव्ही, मोबाइल सोडतच नाहीतशाळा बंद असल्याने मुलांचा अभ्यास मोबाइलवरच होतो, मात्र अभ्यास झाल्यानंतरही मुले मोबाइल सोडत नाहीत. मोबाइल सोडला, तर टीव्ही बघतात. कोरोनामुळे त्यांना बाहेर पाठविणेही शक्य नाही.- योगेश पाटील, पालक
टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या