शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

अखिल भारतीय ‘खासदार चषक’ कबड्डी स्पर्धा केळीवेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:15 IST

अखिल भारतीय ‘खासदार चषक’ कबड्डी स्पर्धा ८ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत केळीवेळी येथे होणार आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यंदा आपले ७५ वर्षे पूर्ण करीत असल्याने या हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याची माहिती कबड्डी स्पर्धेचे संयोजक माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी दिली.

ठळक मुद्देखासदार धोत्रेंचे स्पर्धेला नावआमदारांची भरघोस मदत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अखिल भारतीय ‘खासदार चषक’ कबड्डी स्पर्धा ८ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत केळीवेळी येथे होणार आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यंदा आपले ७५ वर्षे पूर्ण करीत असल्याने या हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याची माहिती कबड्डी स्पर्धेचे संयोजक माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी दिली.शुक्रवारी, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दाळू गुरुजी यांनी स्पर्धेविषयी सविस्तर माहिती दिली. सवरेदयी नेते रामकृष्ण आढे यांनी १९४२ पासून सुरू  केलेले हनुमान मंडळ आज हीरक महोत्सव साजरा करीत आहे. या काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शेकडो खेळाडूंनी खेळप्रदर्शन केले. आजपर्यंत मंडळाच्यावतीने १३ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. विविध स्तरातील लोकांनी आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे केळीवेळीचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. त्यामुळे केळवेळीत भव्य क्रीडांगण उभारता आले, असेही दाळू गुरुजींनी सांगितले.यंदाच्या स्पर्धेत पंजाब, हरियाणा, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्यातील संघ सहभागी होणार आहेत. तसेच राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यांसह विदर्भातील जवळपास सर्वच जिल्हय़ांतील महिला व पुरुष संघ सहभागी होणार आहेत. खेळाडूंची निवास व्यवस्था पीकेव्हीच्या कृषक भवन येथे करण्यात आली. या स्पर्धेला कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, राज्याध्यक्ष जितू ठाकूर यांच्यासह प्रस्तावाला ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनने मान्यता दिल्याने अखिल भारतीय स्तरावरील सामने हीरक महोत्सवी वर्षात होत असल्याचा आनंद होत असून, यानिमित्त स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार असल्याचे दाळू गुरुजी म्हणाले. पत्रकार परिषदेला आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, कबड्डी संघटनेचे सचिव वासुदेव नेरकर, डॉ. राजकुमार बुले, गणेश पोटे, धनंजय मिश्रा, दिलीप आसरे व दिनकर गावंडे उपस्थित होते.

खासदार धोत्रेंचे स्पर्धेला नावखासदार संजय धोत्रे यांनी केळीवेळी गावाला दत्तक घेतले असल्याने त्यांच्याच नावे ही अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा होत आहे.

आमदारांची भरघोस मदतकेळीवेळी गाव कबड्डीपटूंची पंढरी आहे. केळीवेळी गावाचे राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक व्हावे, तसेच अखिल भारतीय स्तर स्पर्धेचे आयोजन यशस्वी होण्याकरिता आमदार रणधीर सावरकर यांनी स्पर्धेला पाच लाखांचा निधी देणार असल्याचे पत्रकार परिषदेत घोषित केले.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणSportsक्रीडाKabaddiकबड्डी