नायगावातील ‘डम्पिंग ग्राउंड’ हटवणार
By Admin | Updated: August 2, 2016 01:51 IST2016-08-02T01:51:19+5:302016-08-02T01:51:19+5:30
आयुक्तांचा निर्णय : प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश

नायगावातील ‘डम्पिंग ग्राउंड’ हटवणार
अकोला : कचरा साठवणुकीसाठी नायगावस्थित ह्यडम्पिंग ग्राउंडह्णवरील जागा अपुरी पडत आहे. परिसरातील अतिक्रमकांनी मनपाच्या जागेवर अवैधरीत्या ताबा घेतल्याने समस्येत अधिकच भर पडली. शहराचा विस्तार व कचर्याची समस्या लक्षात घेता नायगावातील ह्यडम्पिंग ग्राउंडह्ण हटवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी घेतला असून, सोमवारी पर्यायी जागेची पाहणीदेखील केली. तसेच कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
नायगाव परिसरात महापालिकेच्या मालकीच्या सुमारे १२ एकर जागेवर ह्यडम्पिंग ग्राउंडह्ण निर्माण करण्यात आले. याठिकाणी साचणार्या कचर्यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे कचर्याचे ढीग साचले आहेत. शिवाय स्थानिक अतिक्रमकांनी मनपाच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा सपाटा लावल्यामुळे कचरा साठवणुकीच्या संदर्भात विविध अडचणी निर्माण होत आहेत. हा प्रकार कमी म्हणून की काय, शहरातील कचरा घेऊन जाणार्या मनपाच्या घंटागाडी चालकांना शिवीगाळ करणे, धमकावण्यासह मारहाण करण्यापर्यंत अतिक्रमकांनी मजल गाठली आहे. परिणामी घंटागाडी चालकांनी शहराच्या विविध भागात कचरा टाकण्यास सुरुवात केली. यामुळे ऐन पावसाळ्य़ात साथ रोगांचा फैलाव होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
यासंदर्भात ह्यलोकमतह्णने सातत्याने वृत्त प्रकाशित करून कचर्याच्या समस्येवर प्रकाशझोत टाकला. कचर्याची समस्या ध्यानात घेता यावर प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय आयुक्त अजय लहाने यांनी घेतला असून, त्यादिशेने वाटचाल सुरू केली आहे.
नायगावातील ह्यडम्पिंग ग्राउंडह्ण हटवून पर्यायी जागेवर कचरा साठवणू केली जाईल. सोमवारी आयुक्त लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या (आरपीटीएस) मागील जमिनीची पाहणी केली.