बनावट सोने गहाण ठेवणा-यास एक दिवस कोठडी

By Admin | Updated: August 1, 2016 01:13 IST2016-08-01T01:13:14+5:302016-08-01T01:13:14+5:30

बँकेच्या वाशिम शाखेतही ९0 हजारांनी फसवले होते.

Dummy gold mortgages - One day the closet | बनावट सोने गहाण ठेवणा-यास एक दिवस कोठडी

बनावट सोने गहाण ठेवणा-यास एक दिवस कोठडी

अकोला: चांदीच्या दागिन्यांना सोन्याचे पॉलिश देऊन ते एका फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीस रविवारी प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
वाशिम येथील पुसद नाका परिसरातील रहिवासी तुकाराम रामेश्‍वर महाले याने गांधी रोडवर असलेल्या इंडिया फायनान्स कंपनीमध्ये जाऊन ३३ ग्रॅमच्या तीन सोन्याच्या रिंग गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र शाखा व्यवस्थापक राहुल श्यामराव गंगाडे यांनी सोन्याच्या रिंग तपासणीसाठी सोनाराकडे पाठविल्यानंतर त्या बनावट असल्याचे समोर आले. चांदीच्या असलेल्या दागिन्यांवर सोन्याचे पॉलिश देऊन ते दागिने गहाण ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे गंगाडे यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणाची माहिती तत्काळ सिटी कोतवाली पोलिसांना दिली. यासोबतच कंपनीच्या वाशिम येथील शाखेशी संपर्क साधला असता महाले याने कंपनीच्या वाशिम शाखेतही बनावट सोने ठेवून ९0 हजार रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले. या प्रकरणी राहुल गंगाडे यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी तुकाराम महाले याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0, ४0६, ५११ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीला रविवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी आरोपीतर्फे अँड. केशव गिरी, वैशाली गिरी भारती यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Dummy gold mortgages - One day the closet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.