डमी: कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:18 AM2021-05-09T04:18:43+5:302021-05-09T04:18:43+5:30

--बॉक्स-- नियमित प्राणायाम केल्याचे फायदे १. प्राणायाममध्ये अनुलोम-विलोम हे सर्वोत्तम आहे. यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढते. घशात संसर्ग असल्यास उज्जयी ...

Dummy: The amount of pranayama on the corona! | डमी: कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा!

डमी: कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा!

googlenewsNext

--बॉक्स--

नियमित प्राणायाम केल्याचे फायदे

१. प्राणायाममध्ये अनुलोम-विलोम हे सर्वोत्तम आहे. यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढते. घशात संसर्ग असल्यास उज्जयी प्राणायाम करू शकता. यामुळे घशाची खवखव आणि कफ नाहीसा होतो.

२. दिवसभर घरात राहावे लागत असल्याने तणाव, नैराश्य किंवा मानसिक ताण वाढला आहे. यावर भ्रामरी प्राणायाम करू शकता. यामुळे नकारात्मक विचार, तणाव, कमी होऊ लागतात.

३. जे लोक कोरोना आजारापासून लांब आहे, कपालभाती, बाह्य प्राणायम केल्यास मानसिक स्वास्थ चांगले राहते. मकरासन केल्यास ऑक्सिजनची वाहून नेण्याची क्षमता वाढते.

--कोट--

प्राणायाम तज्ज्ञ म्हणतात...

कोरोनामुळे मनशांती भंग झाली आहे. प्राणायाम, योगा मनातील भीती दूर करते. भस्रिका, अनुलोम-विलोम, कपालभाती, बाह्यप्राणायाम महत्त्वाचे प्राणायाम आहे. यामुळे फुप्फुस निरोगी ठेवण्यास मदत होते. कच्छवा, वशिष्ट प्राणायाम ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास फायदेशीर आहे.

- मनोहर इंगळे

--कोट--

नियमित प्राणायामाने मनातील उत्साह कायम राहतो. कोरोनाच्या काळात योग, प्राणायामाचा अंगीकार केल्यास फायदा होऊ शकतो. याकरिता भ्रस्त्रिका, कपालभाती, भ्रामरी प्राणायम करणे गरजेचे आहे. यासोबत अनुलोम-विलोम प्राणायाम फुप्फुसासाठी महत्त्वाचा आहे.

- रेखा वानखडे

--कोट--

नियमित योगा करणारे म्हणतात...

प्रत्येकाने योगा, प्राणायाम केल्यास कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते. भ्रस्त्रिका, अनुलोम-विलोम प्राणायाम महत्त्वाचा आहे. श्वास घेणे, घशासाठी हे प्रणायाम करणे आवश्यक आहे. रुग्ण चांगला झाल्यानंतर योग मनस्वास्थ टिकवून ठेवण्यात मदत करते.

- कुसुम मसणकर

--कोट--

प्राणायामामुळे श्वासोच्छ्वास घेण्यास अडचण येत नाही. दम लागत नाही. कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रस्त्रिका, ओमकार उच्चारण हे प्राणायम करणे आवश्यक आहे.

- योगेश सोनोने

Web Title: Dummy: The amount of pranayama on the corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.