शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘जय संताजी’ नाम घोषाने दुमदुमली मूर्तिजापूर नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 22:35 IST

तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या  पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त १६ डिसेंबर रोजी शहरातील मुख्य मार्गावरून संताजी महाराज यांच्या पालखीची भव्य शोभायात्रा  काढण्यात आली.

ठळक मुद्देतेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या  पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जुनी वस्ती तेलीपुरा येथील समाज भवन परिसरात अखंड  हरिनाम सप्ताह व ज्ञानयज्ञ सोहळा तथा श्रीमद् भागवत कथेचे आयोजन ९ ते १६ डिसेंबर पर्यंत करण्यात आले. भागवत कथेची सांगता १६ डिसेंबर रोजी शहरातील मुख्य मार्गावरून  संताजी महाराज यांच्या पालखीची भव्य शोभायात्रा काढून उत्साहाने करण्यात आली.संत संताजी महाराज मंदिर येथे सप्ताहानिमित्त श्रीमद् भागवत कथेचे वाचन गोभक्त दिनेश  महाराज मोहतुरे भागवताचार्य खुबाळा, ता. सावनेर यांच्या वाणीतून दररोज सकाळी आणि  सायंकाळी करण्यात आले. त्याचप्रमाणे हरिपाठ, भारूड, हरिकीर्तन, भजन आदी धार्मिक  कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भागवत कथा श्रवणाचा आनंद समाजबांधवांनी  मोठय़ा प्रमाणात घेतला. सप्ताहांतर्गत हभप दिलीप मोरखडे, श्रीकृष्ण महाराज, गोपाळ  महाराज बाले, संतोष महाराज ठाकरे, गजानन साबे, विष्णुबुवा रावणकर, माधव काळे,  अरविंद पोळकट, भास्कर उमाळे, दिनकर सावळे, अजाबराव वहिले, अतुल महाराज  पोळकट यांनीही उपस्थिती दर्शवून हरिकीर्तन, भारूड, हरिपाठाने उपस्थितांना मंत्रमुग्ध  केले. १६ डिसेंबर रोजी हभप गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूरकर मठाधीश, इलोरा  यांच्या काल्याचे कीर्तन सकाळी झाले. त्यापूर्वी संताजी महाराज मंदिरापासून संताजी महाराज  यांच्या पालखीची टाळ-मृदंग, हरिपाठ महिला भजन, बँड, अश्‍वासह भव्य शोभायात्रा  काढण्यात आली. ‘जय संताजी माउली’च्या गजराने अख्ख्ये शहर दुमदुमून गेले होते. सं पूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. काल्याच्या कीर्तनानंतर दुपारी १२  ते ३ पर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाच्या यशस्वितेसाठी तेली  समाज पंचकमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक विनायक तुकारामसा गुल्हाने, उपाध्यक्ष  श्रीकृष्ण गुल्हाने, सचिव विठ्ठलराव गुल्हाने, इतर सदस्य व समाजबांधवांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूर