पॅसेंजर गाड्यांच्या कमतरतेमुळे लांबपल्ल्यांच्या गाड्यांवर प्रवाशांचा जोर

By Admin | Updated: July 15, 2014 00:57 IST2014-07-15T00:57:45+5:302014-07-15T00:57:45+5:30

पॅसेंजर गाड्यांचे तिकीट दर सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणारे आहेत.

Due to the shortage of passenger trains, passengers' load on the long-distance trains | पॅसेंजर गाड्यांच्या कमतरतेमुळे लांबपल्ल्यांच्या गाड्यांवर प्रवाशांचा जोर

पॅसेंजर गाड्यांच्या कमतरतेमुळे लांबपल्ल्यांच्या गाड्यांवर प्रवाशांचा जोर

अकोला : पॅसेंजर गाड्यांचे तिकीट दर सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणारे आहेत. कदाचित यामुळेच दैनंदिन कामकाजानिमित्त रेल्वेने प्रवास करणारे चाकरमानी व इतर प्रवासी पॅसेंजरने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. सद्यस्थितीत रेल्वेच्या प्रत्येक विभागात राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक करणार्‍या पॅसेंजर गाड्यांची कमतरता असून, फेर्‍यादेखील कमी असल्याने लांबपल्ल्यांच्या गाड्यांवर प्रवाशांचा जोर वाढला आहे. केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर मोदी सरकारने मंगळवारी संसदेत पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी ५८ नवीन गाड्या सुरू करण्याची घोषणा केली. २७ नव्या गाड्यांसह ५ प्रीमियम, ५ जनसाधारण, ६ संपूर्ण वातानुकूलित, २ एमईएमयू, २ डीईएमयू गाड्यांसह ८ नवीन पॅसेंजर गाड्यांचा यात अंतर्भाव करण्यात आला आहे. उपनगरीय गाड्यांनी देशातील विविध प्रमुख शहरे जोडल्या गेली आहेत. पश्‍चिम महराष्ट्रातदेखील लोकसंख्येच्या प्रमाणात उपनगरीय रेल्वे गाड्या धावत असतात. राज्यांतर्गत प्रवास करणार्‍या इतर सर्वसामान्य जनतेसाठी रेल्वे प्रशासनाद्वारे लहान-लहान पल्ल्याच्या पॅसेंजर गाड्या चालविल्या जातात. तिकिटांचे दर कमी असल्यामुळे दैनंदिन कामकाजानिमित्त रेल्वेने प्रवास करणार्‍या चाकरमान्यांसह इतर प्रवासी पॅसेंजरने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. पूर्वीच्या तुलनेत पॅसेंजरने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्यादेखील अधिक वाढली असून, त्या तुलनेत प्रत्येक विभागात धावणार्‍या पॅसेंजर गाड्यांची संख्या कमी पडू लागली आहे. परिणामी लांबपल्ल्यांच्या गाड्यांवर प्रवाशांचा भडिमार होत आहे. परवानगी नसतानादेखील अनेक प्रवासी बळजबरीने रिझर्व्हेशन डब्यांमध्ये चढून अरेरावी करतात. लांबपल्ल्यांच्या गाड्यांचे तिकीट दर परवडत नसल्याने विनातिकीट प्रवास करणार्‍यांची संख्यादेखील अधिक आहे. या सर्व बाबींवर रोख लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने प्रत्येक विभागात पॅसेंजर गाड्यांची संख्या आणि त्यांच्या फेर्‍या वाढविण्याची गरज असताना मंगळवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात याबाबत कुठल्याच उपयायोजना करण्यात आलेल्या नसल्याने एक्स्प्रेस गाड्यांवर प्रवाशांचा जोर अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Due to the shortage of passenger trains, passengers' load on the long-distance trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.