वाढत्या तापमानामुळे दूध उत्पादनावर होणार परिणाम

By Admin | Updated: April 8, 2015 01:42 IST2015-04-08T01:42:39+5:302015-04-08T01:42:39+5:30

पोषक चारा निर्मितीवर भर देणे आवश्यक

Due to rising temperature, the result of the production of milk | वाढत्या तापमानामुळे दूध उत्पादनावर होणार परिणाम

वाढत्या तापमानामुळे दूध उत्पादनावर होणार परिणाम

प्रवीण खेते/अकोला: अकोला जिल्हा हा कोरडवाहू भागामध्ये मोडत असल्याने उन्हाळ्य़ात साहजिकच पाणीटंचाई सोबतच चारा टंचाईचा गंभीर प्रश्न पशुधन पालकांना सतावतो. उन्हाच्या वाढत्या पार्‍यामुळे आगामी काळात दूध उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तेव्हा जिल्ह्यातील दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पशुधन पालकांनी पोषक चारा उत्पादनावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
भौगोलिक मापदंडाचा विचार केला, तर जिल्हा हा कोरडवाहू भागात मोडत असून, येथील शेती व चारा उत्पादन पावसाळ्य़ावर अवलंबून आहे. पावसाळ्य़ात चांगला पाऊस झाल्याने हिवाळ्य़ात जनावरांना आवश्यक तो पोषक आहार मिळतो. परिणामी हिवाळ्य़ामध्ये जिल्ह्याची दूध उत्पादन क्षमता वाढलेली असते; परंतु, उन्हाळा लागताच हळूहळू जिल्ह्यातील दूध उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होताना दिसतो. साधारणत: मार्चअखेरीस जिल्ह्याची दूध उत्पादन क्षमता कमी व्हायला सुरुवात होते; परंतु, यंदा गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जनावरांना काही प्रमाणात हिरवा चारा मिळाला. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दूध उत्पादनावर जास्त परिणाम झाला नसला तरी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे आगामी काळात दूध उत्पादनावर परिणाम दिसून येणार आहे.
आगामी काळात उन्हाचा पारा वाढणार असल्याने जनावरांसाठी पोषक चारा निर्मितीची चिंता पशुधन पालकांना सतावणार आहे. तेव्हा वेळीच नियोजन करून जनावरांसाठी पोषक चार्‍याच्या निर्मितीसाठी पशुपालकांनी दक्ष असणे गरजेचे आहे.

Web Title: Due to rising temperature, the result of the production of milk