विहिरीतील गाळ काढताना कपार कोसळून मजुराचा मृत्यू
By Admin | Updated: May 22, 2015 01:47 IST2015-05-22T01:47:02+5:302015-05-22T01:47:02+5:30
अकोला जिल्ह्यातील घटना; तीन मजूर जखमी.

विहिरीतील गाळ काढताना कपार कोसळून मजुराचा मृत्यू
सायखेड (जि. अकोला) : निंबी चेलका येथे गावालगत खोदकाम होत असलेल्या विहिरीतील मलबा काढताना खिळखिळी झालेली कपार कोसळून त्याखाली चार मजूर दबले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण जखमी झाले. ही घटना २१ मे रोजी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास घडली.
निंबी चेलका येथील शेतकरी संजय नामदेव तिवाले यांच्या शेतात धडक सिंचन योजनेतील विहिरीचे काम सुरू असताना हा अपघात झाला. जखमी झालेल्या आत्माराम शालीग्राम करवते (४५) या आदिवासी मजुराचा उपचारादरम्यान अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेले गौतम यशवंत करवते, यशवंत मानाजी करवते, राहुल आत्माराम करवते यांच्यावर प्रथम बाश्रीटाकळीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले.