शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या पाठबळाअभावी, साहित्यिकांच्या उदासीनतेमुळे मराठी भाषा अभिजात दर्जापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 12:22 IST

सत्तेच्या पाठबळाचा अभाव, साहित्यिकांची उदासीन, असलेले मतभेद यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू शकला नसल्याची खंत अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवींनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

अकोला: कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. मराठी भाषा ही चिरंतन आहे. मराठी ही मातृभाषा आहे. तिला अभिजात दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे; परंतु सत्तेच्या पाठबळाचा अभाव, साहित्यिकांची उदासीन, असलेले मतभेद यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू शकला नसल्याची खंत अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवींनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.तमिळ भाषेसह संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिया आदी भाषांना अभिजात दर्जा मिळतो. केंद्र सरकारने कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रामुख्याने श्रेष्ठता हाच निकष लावला आहे. प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता हे या दर्जासाठीचे चार निकष आहेत. मराठी भाषा हे चारही निकष पूर्ण करीत असूनही तिला अभिजात दर्जा मिळण्यासाठी झगडावे लागत आहे. हेच दुदैव असल्याचे मतही ज्येष्ठ साहित्यिकांनी व्यक्त केले.सत्तेचे पाठबळ आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नाही. साहित्य संमेलने घेण्याचा उत्साह असतो; परंतु मराठी भाषेविषयी मात्र, निरुत्साह दिसून येतो. साहित्यिकांमध्ये मतभेद, गटतट आहेत. स्वत:च्या कामासाठी साहित्यिक राजकीय नेत्यांकडे चकरा घालतात; परंतु मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी कोणी आग्रही दिसत नाही. हा मुद्दाही सातत्याने लावून धरल्या जात नाही. हिंदी, दाक्षिणात्य भाषिकांसारखी तडफच आमच्यात नाही. आणि मराठीला अभिजात दर्जा मिळाला तर त्याने काय फरक पडेल. मानसिक समाधान मिळेल. तेवढेच.-नारायण कुळकर्णी कवठेकर, प्रसिद्ध कवीमराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याविषयीचा निर्णय शासनस्तरावरील आहे. शासनाने प्रयत्न केले तर अभिजात दर्जा मिळणे शक्य आहे. दरवर्षी मराठी राजभाषा दिनाला आम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल, याची वाट पाहतो; परंतु निराशाच पदरी पडते. अमृतापेक्षाही मधुर अशी मराठी भाषा आहे; परंतु मराठीला अभिजात दर्जा मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. साहित्यिकांनाही त्यासाठी पुढाकार घ्यावा.-सीमा रोठे (शेट्ये) कार्याध्यक्षविदर्भ साहित्य संघ, अकोला शाखा

मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे, यासाठी केवळ तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न केले होते; परंतु त्यानंतर एकाही राजकीय नेत्याला प्रयत्न करावासा वाटला नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळो अथवा न मिळो, त्यापेक्षा मराठी भाषा व शाळांचा शैक्षणिक दर्जा कसा सुधारेल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. या प्रयत्नातूनच मराठी भाषेचे अस्तित्व टिकून राहील.- श्रीकांत तिडके, माजी सदस्यभाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासनप्राचीन अशा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी झगडावे लागते, हे दुर्दैव आहे. राजकीय नेतेसुद्धा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याविषयी उदासीन आहेत. आमच्यावर हिंदी व इंग्रजी भाषेचा प्रभाव असल्यामुळे मराठीला आम्ही दुय्यम समजतो. मातृभाषा असूनही मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यात केंद्र स्तरावर आमचे राजकीय नेते, साहित्यिक मंडळी कमी पडतात.डॉ. रामेश्वर भिसे, प्राचार्य,श्री शिवाजी महाविद्यालय

 

टॅग्स :Akolaअकोलाliteratureसाहित्यMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिन