स्थानिकांच्या मदतीमुळे वाचले अकोल्यातील डॉक्टर दांपत्यांचे प्राण
By Admin | Updated: July 11, 2016 10:19 IST2016-07-11T10:18:09+5:302016-07-11T10:19:08+5:30
अकोला येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. सुरेश मुंदडा, पत्नी व ड्रायव्हरसह मुसळधार पावसात अडकलेले असताना स्थानिकांच्या मदतीमुळे त्यांचे प्राण वाचले

स्थानिकांच्या मदतीमुळे वाचले अकोल्यातील डॉक्टर दांपत्यांचे प्राण
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ११ - अकोला येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. सुरेश मुंदडा, पत्नी व ड्रायव्हरसह मुसळधार पावसात अडकलेले असताना स्थानिकांच्या मदतीमुळे त्यांचे प्राण वाचले. डॉ. मुंदडा, पत्नी पुष्पा मुंदडा व ड्रायव्हर संजय गुलहानेसह अमरावतीमार्गे दर्यापूर येथून जात असताना त्यांची I-20 ही गाडी लासूरजवळील गायठी नाल्या पात्रात वाहून जात असताना एका झाडावळ अडकली. ही बातमी रात्पी दीडच्या सुमारास गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना समजताच त्यांनी तहसीलदार कार्यालयाला कऴवत मदत पाठवण्यात सांगितले. दर्यापूर तहसीलदार ठाणेदार व त्यांच्या पूर्ण टीमने मध्यरात्री २ पासून अथक प्रयत्न करूने मुंदडा कुटुंबाला वाचवले. पहाटे साडेपाच वाजता ही मोहिम यशस्वीरित्या पूर्ण झाली. मध्यरात्री २ वाजता स्पीड बोटीचा वापर करून आरडीसी पातूरकरांनी भक्कम रसद पुरवली. स्थानिक नागरीक पवन मेश्रे यांच्या जिगरबाजीमुळे डॉ. मुंदडा व त्यांच्या कुटुंबियांचे प्राण वाचले.