शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

दुष्काळाची चाहूल; शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 12:55 IST

सलग तीन वर्षांपासून दुष्काळ अन् नापिकीने आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या स्थितीने धास्तावला आहे.

ठळक मुद्देजुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्ध्याअधिक पेरण्या रखडल्या आहेत. पाऊस नसल्याने अल्प कालावधीतील मूग, उडीद आदी पिके बाद होणार आहेत. या आठवड्यात वातावरण ढगाळलेले असताना पाऊस मात्र बेपत्ता आहे.

अकोला: यंदाच्या पावसाळ्याचे १२० पैकी ४० दिवस झाले असतानाही पावसाची सरासरी कमी आहे. विशेष म्हणजे, २४ जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सक्रिय न झाल्याने जुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्ध्याअधिक पेरण्या रखडल्या आहेत. येत्या १७ तारखेपर्यंत पावसाची ही स्थिती कायम राहणार असल्याची हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे सलग तीन वर्षांपासून दुष्काळ अन् नापिकीने आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या स्थितीने धास्तावला आहे. मूग, उडीद पिके बाद होणारयंदाच्या हंगामात पावसाळ्याच्या ४० दिवसानंतरही पेरणीयोग्य पाऊस नसल्याने अल्प कालावधीतील मूग, उडीद आदी पिके बाद होणार आहेत. जिल्ह्यात उडिदाचे क्षेत्र ११ हजार ९७८ हेक्टर असून, आतापर्यंत ५ हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. तर मुगाचीही पेरणीही केवळ १२ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात पावसाने जून अखेरीची सरासरीही गाठलेली नाही. ३० जूनपर्यंत १४३.६ मिमी पाऊस अपेक्षित होता; मात्र प्रत्यक्षात १३३.२ मिमी पाऊस झाला तर ११ जुलैपर्यंत केवळ २१६.२ मिमी पाऊस झालेला आहे. या आठवड्यात वातावरण ढगाळलेले असताना पाऊस मात्र बेपत्ता आहे. त्यामुळे अर्ध्याअधिक क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. जमिनीत आर्द्रता नाही. भूजलात प्रचंड घट आहे. सिंचन विहिरींनी तळ गाठलेला आहे. ही स्थिती यंदाही दुष्काळाची चाहूल देणारी असल्याने सद्यस्थितीत बळीराजा धास्तावला आहे. जलसाठ्यात घट!अकोला शहराची जीवनरेखा बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा मोठ्या धरणात केवळ ४.७५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तेल्हारा तालुक्यातील वान धरणात २६.२८ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम प्रकल्पात शून्य टक्के, उमा शून्य टक्के, घुंगशी बॅरेज शून्य टक्के जलसाठा असून, मोर्णा धरणात आजमितीस ११.३९ टक्के जलसाठा आहे.

 जुलैअखेरपर्यंत कपाशी, सोयाबीनची पेरणीपावसाच्या उशिरामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर ६० दिवसांच्या कालावधीतल्या मूग व उडीद पिकाची पेरणी करता येणार नाही. सोयाबीन व येणारे कपाशीचे पीक घेता येणार आहे. सुधारित कपाशीच्या देशी सरळ वाणाची पेरणी करावी. यामध्ये २५ टक्के जादा बियाण्यांचा वापर व २५ टक्के कमी खतांचा वापर करावा, अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेतीdroughtदुष्काळ