शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नाफेडच्या खरेदी बंदमुळे मूर्तीजापूर बाजार समितीत शेतमालाचे भाव पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 3:09 PM

मूर्तीजापूर :  नाफेड कडून हजारो क्विंटल शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात आला असून त्यांच्या मालाचे पैसे अद्यापही खात्यात जमा झाले नसल्याने तो नाफेडच्या अॉनलाईन जाचामुळे हतबल झाला आहे. नाफेडने अचानक खरेदी बंद केली असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाची आवक वाढली आहे, त्यामुळे पडलेल्या भावात शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागत आहे.

ठळक मुद्दे तुर खरेदी १५ मे पासून व हरभरा खरेदी २९ मे पासून अचानक बंद केल्याने ७० टक्के शेतकऱ्याचा माल घरी तसाच पडून आहे.भाव प्रचंड कोसळले असून तुर तीन हजार पाचशे रुपये आणि हरभरा तीन हजार दोनशे भावाने खरेदी करण्यात येत आहे.पेरणी पुर्व मशागतीसाठी आणि मुलाच्या शालेय शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आपला उर्वरित शेती माल बेभाव विकण्याची पाळी आली आहे.

- संजय उमकमूर्तीजापूर :  नाफेड कडून हजारो क्विंटल शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात आला असून त्यांच्या मालाचे पैसे अद्यापही खात्यात जमा झाले नसल्याने तो नाफेडच्या अॉनलाईन जाचामुळे हतबल झाला आहे. नाफेडने अचानक खरेदी बंद केली असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाची आवक वाढली आहे, त्यामुळे पडलेल्या भावात शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागत आहे.नाफेडने आतापर्यंत ५४ हजार क्विंटल तुर तर चार हजार क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. मार्च २७ पर्यंत चुकारे केले आहे, एप्रिल, मे मध्ये खरेदी केलेल्या मालाचे चुकारे अजूनही झालेले नाही. तुर खरेदी १५ मे पासून व हरभरा खरेदी २९ मे पासून अचानक बंद केल्याने ७० टक्के शेतकऱ्याचा माल घरी तसाच पडून आहे.नाफेडकडू तुर पाच हजार चारशे पन्नास रुपये व हरभरा चार हजार चारशे पन्नास रुपये भावाने खरेदी करण्यात आला, त्या तुलनेत कृषी उत्पन्न बाजार समितीत भाव प्रचंड कोसळले असून तुर तीन हजार पाचशे रुपये आणि हरभरा तीन हजार दोनशे भावाने खरेदी करण्यात येत आहे. संपूर्ण व्यवहार शेतीच्या भरवशावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर पेरणीचे दिवस तोंडावर आल्याने तसेच पेरणी पुर्व मशागतीसाठी आणि मुलाच्या शालेय शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आपला उर्वरित शेती माल बेभाव विकण्याची पाळी आली आहे.सात तारखेपर्यंत सर्व उर्वरित चुकारे व सात तारखेला हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती परंतु ना खरेदी केंद्र सुरू झाले ना शेतकऱ्यांच्या खात्यात एक पैसा जमा झाला. फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासन करीत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येत आहेत. नाफेड खरेदीसाठी ज्या शेतकऱ्यांनी अॉनलाईन नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदानाच्या धर्तीवर प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचे शासनाने ठरवले असून चुकाऱ्यासोबतच अनुदानाची रक्कम देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालूक्यातील धान्य गोडाऊन फुलबुलढाणा अर्बन व वखार महामंडळाचे संपुर्ण गोडाऊन फुल झाले असून स्थानिक शेतकऱ्यांना धन्य ठेवायला जागाच उरली नाही अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, मलकापूर येथील व्यापाऱ्यांनी गोडाऊनवर कब्जा केल्याने तालुक्यातील गोडाऊन तुडुंब भरले आहे, नाफेडची खरेदी सूर न होण्या मागे हे सुध्दा एक कारण आम्ही खरेदी केलेला माल ठेवायचा कुठे असा प्रती प्रश्न नाफेडकडू करण्यात आला आहे.  

चुकारे न होणे, खरेदी करण्यासाठी विविध प्रकारचे अडथळे निर्माण होणे, शासन खरेदीसाठी तारीख वारंवार वाढवून देत असतात खरेदी सुरू करण्यात करण्यात येत नाही अर्थात सदर यंत्रणेवर जिल्हाधिकाऱ्यांचा अंकुश नसल्याने ही यंत्रणा अपयशी आणि कुचकामी ठरली आहे.डॉ. अमित कावरेशेतकरी तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तीजापूरहरभरा, तुर पेरा किती, मालाची आवक किती असणार त्यासाठी बारदाण किती लागणार व खरेदी केंद्रे किती असावीत हे सर्व माहित असताना शासनाने ठरवून व नियोजनबद्ध काहीच केले नाही.खरा उद्देश शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याचा असता तर शासनासाठी नियोजन करणे ही मोठी गोष्ट नाही, नाफेड खरेदी बंद झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीतील मालाचे भाव प्रचंड प्रमाणात पडले आहेत खरीप हंगाम पुर्व तयारी सुरू असताना नाफेडचे चुकारे नाहीत, शेवटी शेतकऱ्यांना आपला माल पडत्या भावाने विकावा लागणार..मनोज तायडेसंयोजक शेतकरी जागर मंच मूर्तीजापूर केंद्रावर आतापर्यंत नाफेडने ५४हजार क्विंटल तुर तर ४हजार क्विंटल हरभरा खरेदी केला आहे. यासंदर्भात शासनाकडे अॉनलाईन पोर्टल सूर करण्यासाठी आम्ही पत्र पाठविले आहे जेणेकरून पोर्टल सूर होऊन शेतकऱ्यांचे चुकारे त्यांच्या खात्यात अॉनलाईन जमा होतील परंतु शासनाकडून त्यावर अद्याप काहीही उत्तर मिळाले नाही.डी. एन. मुळेव्यवस्थापक खरेदी विक्री संघ, मूर्तीजापूरनाफेडची खरेदी बंद असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुर्वीच्या तुलनेत मालाची आवक वाढली रोज एक हजार क्विंटल खरेदी होत होती मात्र आता ती अडीच हजार क्विंटलचे वर गेली आहे.रितेश मडघेसचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूर्तीजापूर 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर