नातेवाईक न आल्याने सर्वोपचार रुग्णालयात मृतदेह पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 13:21 IST2018-09-29T13:21:30+5:302018-09-29T13:21:39+5:30

दोन दिवस उलटले असतानाही सदर मृतकाचे नातेवाईक मृतदेह घेण्यास न आल्यामुळे हा मृतदेह दोन दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयात पडून आहे.

 Due to the absence of a relative, the bodies of the victims were lying in the hospital | नातेवाईक न आल्याने सर्वोपचार रुग्णालयात मृतदेह पडून

नातेवाईक न आल्याने सर्वोपचार रुग्णालयात मृतदेह पडून

अकोला: टिळक रोडवरील अलंकार मार्केट परिससरातील रहिवासी एका ७७ वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. दोन दिवस उलटले असतानाही सदर मृतकाचे नातेवाईक मृतदेह घेण्यास न आल्यामुळे हा मृतदेह दोन दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयात पडून आहे.
अलंकार मार्केट परिसरातील रहिवासी मनोहर हरिभाऊ राहुलवार (७७) यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना २५ सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनोहर राहुलवार यांच्या नातेवाइकांनीच त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी राहुलवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या प्रकाराची माहिती मृतकाच्या नातेवाइकांना देण्यात आली; मात्र दोन दिवसांपासून ते मृतदेह घेण्यास न आल्यामुळे रामदास पेठ पोलिसांनी सदर मृतदेह दोन दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात ठेवला आहे. मृतकाच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंतिम संस्कार करण्याचे आवाहन रामदास पेठ पोलिसांनी केले आहे.

 

Web Title:  Due to the absence of a relative, the bodies of the victims were lying in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.