कोरड्या विहिरीत बिबट पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 02:20 IST2016-04-15T02:20:12+5:302016-04-15T02:20:12+5:30
संग्रामपूर तालुक्यातील घटना.

कोरड्या विहिरीत बिबट पडले
संग्रामपूर (जि. बुलडाणा) : तालुक्यातील आलेवाडी शिवारातील महेबूब गौलकार यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना १४ एप्रिल रोजी रात्री घडली. पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. पाण्याच्या शोधार्थ बिबट्या आलेवाडी शिवारात गौलकार यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडला. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच पथक तातडीने घटनास्थळी धावले. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे उपवनसंरक्षक भगत, वनपाल झामरे, आगरे, नीलेश धारपवार, अनिल पारधी, गजानन कुटे आदींनी प्रयत्न सुरु केले आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत तरी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात या पथकाला यश आले नव्हते, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद यांनी दिली.