औषध विक्रेत्यांचा बंद यशस्वी!

By Admin | Updated: May 31, 2017 01:40 IST2017-05-31T01:40:33+5:302017-05-31T01:40:33+5:30

अकोला: आॅनलाइन औषध विक्रीच्या प्रस्तावित शासनाच्या धोरणाविरुद्ध अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने छेडलेल्या देशव्यापी आंदोलनात अकोला डिस्ट्रिक केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने सहभाग नोंदविला.

The drug vendors closed! | औषध विक्रेत्यांचा बंद यशस्वी!

औषध विक्रेत्यांचा बंद यशस्वी!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: आॅनलाइन औषध विक्रीच्या प्रस्तावित शासनाच्या धोरणाविरुद्ध अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने छेडलेल्या देशव्यापी आंदोलनात अकोला डिस्ट्रिक केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने सहभाग नोंदविला. या आंदोलनास शतप्रतिशत पाठिंबा मिळाल्याने अकोल्यातील ५१८ दुकान बंद राहिलेत.
अकोलेकरांची गैरसोय होऊ नये यासाठी असोसिएशनने सिव्हिल लाइन चौकातील श्री. दत्त मेडिकल्स आणि वर्षा मेडिकल्स सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे अकोलेकरांनी या दोन औषध दुकानांवर एकच गर्दी केली. सिव्हिल लाइन चौकातील श्री. दत्त मेडिकल्सवरील गर्दी आवरत नसल्याने येथे मांडव उभारून येथे औषधी विक्री केली गेली. या ठिकाणी समाजसेवी युवकांनीदेखील मंगळवारी सेवा दिली. या आंदोलनात सुधीर वोरा, अंजुल जैन, अरुण अग्रवाल, मंगेश घुगुल, धर्मेंद्र थोरात, संजय पवार, दिलीप बजाज, अब्दुल विखार आदी शेकडे पदाधिकारी प्रामुख्याने सहभागी झाले होते. संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना निवेदन दिले. तत्पूर्वी मोटरसायकल रॅली काढण्यात आली.

दत्त मेडिकल्सचे उत्पन्न कॅन्सरग्रस्तांना
नेहमीप्रमाणे संकटाच्या वेळी अकोलेकरांना सेवा देणाऱ्या दत्त मेडिकलने मंगळवारीही आपले आपले कर्तव्य बजावले. सकाळी दहा वाजतापासून तर रात्री दीड वाजेपर्यंत ही सेवा अविरत सुरू ठेवली. असोसिएशनच्या धोरणासोबत असलो तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण ही सेवा दिली. सोबतच मंगळवारी कमाविलेला प्रत्येक पैसा संत तुकाराम हॉस्पिटलला कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी दिला जाणार आहे. ही रक्कम एक लाखाच्या घरात जाणार आहे अशी माहिती दत्त मेडिकल्सचे संचालक प्रकाश सावल यांनी दिली.

Web Title: The drug vendors closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.