शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी गावांना सोडले वाऱ्यावर; उपाययोजना राबविण्याचा आदेश कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 13:28 IST

दुष्काळासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचा दिलेला आदेश कागदावरच असल्याचा प्रकार गेल्या तीन महिन्यांत राज्यात घडला आहे.

अकोला : राज्यातील ४४४९ गावांमध्ये गेल्या हंगामात ५० पेक्षा कमी पैसेवारी असल्याचे निश्चित झाले. त्या भागात दुष्काळी स्थिती जाहीर करीत दुष्काळासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचा दिलेला आदेश कागदावरच असल्याचा प्रकार गेल्या तीन महिन्यांत राज्यात घडला आहे. विशेष राज्यातील एकाही जिल्ह्यात उपाययोजना राबविल्याच नसल्याची माहिती आहे.२०१८-१९ च्या खरीप हंगामात राज्यातील ४४४९ गावे दुष्काळी असल्याचे शासनाने २५ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या आदेशाने घोषित केले. संबंधित जिल्ह्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना राबविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. अकोला जिल्ह्यातही आधी पाच तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले. त्यानंतर उर्वरित दोन तालुक्यांतील मिळून जिल्ह्यातील सर्वच ९९० गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याने दुष्काळ घोषित करण्यात आला. काही गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी टँकर वगळता एकही उपाययोजना जिल्ह्यामध्ये राबविण्यात आली नाही, हे विशेष.शेतकºयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या दुष्काळी उपाययोजनांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती, सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्याची सोय आहे; मात्र जिल्ह्यातील कोणत्याच बँकेने थकीत कर्ज वसुलीला स्थगिती दिली नाही. त्याउलट कर्ज भरल्याशिवाय चालू वर्षात कर्जच देणार नाही, असा पवित्रा बँकांनी घेतला. त्यामुळे ज्या शेतकºयांच्या हितासाठी दुष्काळ घोषित केला, त्यांना शासन आदेशाचा काडीमात्रही फायदा झालेला नाही. त्यासाठी सर्वच जबाबदार शासकीय यंत्रणांवर कारवाई होणे आवश्यक आहे.- कागदावरच असलेल्या दुष्काळी उपाययोजनाजमीन महसुलात सूट देणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकºयांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.- अनुपालन अहवालात होणार दिशाभूल!दुष्काळी उपाययोजना राबविण्याच्या आदेशातच शेतकºयांना विविध सवलती देताना त्याचा आर्थिक भार त्या प्रशासकीय विभागांनी उचलावा, आवश्यक निधी उपलब्ध करावा, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महसूल व वन विभागाला सादर करावा, असे सांगण्यात आले. त्यानुसार संबंधित विभागांनी काय केले, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळ