दुकानांची टेक्नोसॅव्ही नावे करतायत ग्राहकांना आकर्षित!

By Admin | Updated: November 18, 2016 16:04 IST2016-11-18T16:04:44+5:302016-11-18T16:04:44+5:30

ग्राहकांना इंटरनेट व संगणकीय जगाशी जोडणारी टेक्नोसॅव्ही नावे अकोल्यातील सिव्हिल लाइन मार्गावरील व्यावसायिकांनी आपल्या दुकानांना दिली आहेत.

Driving customers' technosavi names attract customers! | दुकानांची टेक्नोसॅव्ही नावे करतायत ग्राहकांना आकर्षित!

दुकानांची टेक्नोसॅव्ही नावे करतायत ग्राहकांना आकर्षित!

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 18 - आपण कधी लक्ष दिलंय, आजकाल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांद्वारे नवनवीन हायटेक फंडे आत्मसात केले जात आहेत. ग्राहकांना इंटरनेट व संगणकीय जगाशी जोडणारी टेक्नोसॅव्ही नावे अकोल्यातील सिव्हिल लाइन मार्गावरील व्यावसायिकांनी आपल्या दुकानांना दिली असून, दैनंदिन जीवनात अंगवळणी पडलेल्या या नावांमुळे ग्राहक त्याकडे आकर्षिले जात आहेत. 
 
उद्योग व्यवसाय क्षेत्रातील संस्कृतीचे हे बदलते स्वरूप प्रत्येकाला हवेहवेसे वाटणारे असल्याने, मोठ्या शहराच्या धर्तीवर अकोल्यातील व्यावसायिकांनीदेखील आपल्या प्रतिष्ठानांच्या ‘जुनाट पाट्या’ बदलण्यास प्रारंभ केला आहे. सोशल मीडियाचा स्पर्श झाला नाही, अशी व्यक्ती आता शोधूनही सापडणार नाही. कॉम्प्युटर आणि मोबाइलवर इंटरनेट हाताळत असताना, आज प्रत्येकजण आधुनिक जगाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहे.
 
ग्राहकांची नेमकी हीच नस, सिव्हिल लाइन मार्गावरील उद्योग व्यावसायिकांनी ओळखली असून, आपल्या प्रतिष्ठानांना एका वेगळ्या दुनियेला जोडणारी टेक्नोसॅव्ही नावे त्यांनी दिली आहेत. रेडीमेड कपडे, खाद्यपदार्थ, मोबाइल विक्री व दुरुस्तीसह इतर विविध साहित्य विक्रेत्यांनी आपल्या प्रतिष्ठनांना ‘ऑनलाइन’, ‘डॉट कॉम’, ‘गूगल’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘ट्विटर’, ‘वाय-फाय’, ‘अ‍ॅपल’, ‘सिलेक्ट’, ‘प्ले स्टोअर’, ‘एचडी वर्ल्ड’, ‘पिकप पॉइंट’, ‘रॉकस्टार’, ‘वॉव’, ‘स्मार्ट’, ‘झेडएक्स’, ‘स्टुडिओ 69’, ‘शॉर्ट मिल सर्व्हिस’, ‘एसएमएस-पावभाजी सेंटर’ अशी हायटेक नावे दिली आहेत. दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या या टेक्नोसॅव्ही शब्दांमुळे ग्राहकसुद्धा त्याकडे आकर्षिले जात आहेत.
 

Web Title: Driving customers' technosavi names attract customers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.