रस्त्याच्या बाजूला तोडून लाकडाच्या ओंडक्यामुळे वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST2021-04-21T04:18:34+5:302021-04-21T04:18:34+5:30
रस्त्याच्या कामामुळे अनेकदा गावात जाणारी पाइपलाइन फुटली होती. वाडेगावमध्ये आठ ते दहा दिवस पाणीपुरवठा बंद होता. आता रस्त्याच्या दोन्ही ...

रस्त्याच्या बाजूला तोडून लाकडाच्या ओंडक्यामुळे वाहनचालक त्रस्त
रस्त्याच्या कामामुळे अनेकदा गावात जाणारी पाइपलाइन फुटली होती. वाडेगावमध्ये आठ ते दहा दिवस पाणीपुरवठा बंद होता. आता रस्त्याच्या दोन्ही बाजू खोदून ठेवल्याने किरकोळ अपघात होत आहेत. परिणामी अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे तोडली असून, ते सर्व तोडलेल्या झाडांची ओंडके रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. याबाबत शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा तक्रार केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वाडेगाव रस्त्यालगत ७० ते ८० झाडे कापलेले आहेत. गत दोन महिन्यांपासून वृक्षांचे ओंडके रस्त्यावर पडून आहेत. वाडेगाव येथील नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
फोटो:
मागील दाेन महिन्यांपासून कापलेलेल्या झाडाचे ओंडके रस्त्यावर पडून आहेत. तक्रार करूनही अधिकारी लक्ष देत नाही. अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्यावरील लाकडाचे ओंडके बाजूला करावेत.
-श्रीकांत मसने, ग्रामस्थ
रस्त्यावर पडून असलेल्या लाकडांच्या ओंडक्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून ओंडके रस्त्यावरून हटविण्यात येतील.
-प्रज्ञा राजकुमार अवचार, सदस्य ग्रामपंचायत वाडेगाव