कारच्या अपघातात चालक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:18 IST2021-04-24T04:18:48+5:302021-04-24T04:18:48+5:30

निंबा फाटा : अंदुरा येथून निंबा फाट्याकडे येणारी भरधाव कार हाता फाट्यानजीक रस्त्याच्या खाली शेतात उलटली. या अपघातात कारचालक ...

The driver is serious in a car accident | कारच्या अपघातात चालक गंभीर

कारच्या अपघातात चालक गंभीर

निंबा फाटा : अंदुरा येथून निंबा फाट्याकडे येणारी भरधाव कार हाता फाट्यानजीक रस्त्याच्या खाली शेतात उलटली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाल्याची घटना दि. २३ फेब्रुवारी रोजी घडली.

शेगावहून अंदुराकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कार क्र. (एम.एच.०२ सी.आर.६८९०)चा चालक शिवाजी केणे हा मद्यधुंद असल्याने त्याचा कारवरील ताबा सुटल्याने निंबा फाट्यावरील बॅरिकेड्सला धडक दिली. हाता फाट्यानजीक कार उलटली. या अपघातात कारचालक शिवाजी केणे हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच उरळ पो. स्टे.चे ठाणेदार अनंत वडतकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे, वाहतूक पोलीस किशोर पाटील, पद्यसिंह बैस यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला पुढील उपचाराकरिता अकोला येथे पाठविले.

Web Title: The driver is serious in a car accident