कारचालकाने दुचाकीस उडविले; १ ठार, २ गंभीर
By Admin | Updated: August 14, 2014 02:02 IST2014-08-14T01:36:08+5:302014-08-14T02:02:02+5:30
मूर्तिजापूर तालुक्यातील घटना.

कारचालकाने दुचाकीस उडविले; १ ठार, २ गंभीर
मूर्तिजापूर : भरधाव इंडिगो कारच्या चालकाने दुचाकीस धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावरील जामठी फाट्यानजीक १३ ऑगस्ट रोजी घडली.
अकोल्याहून अमरावतीकडे जात असलेल्या एम. एच. २८ व्ही. ८१२२ क्रमांकाच्या कारच्या चालकाने कवठा सोपीनाथ येथून माना येथे कुटुंबासह जात असलेल्या भाऊराव नथ्थू कर्नर (३५) यांच्या एम. एच. ३0 ए.के. ५२६६ क्रमांकाच्या दुचाकीस जामठी फाट्यानजीक एल अँन्ड टी कंपनीच्या गेटसमोर धडक दिली. या अपघातात भाऊराव कर्नर, पत्नी सुनीता (२५) व मुलगा पप्पू (४) हे तिघेही गंभीर जखमी झाले. कारचालकाने तिघांना उपचारार्थ मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख सामान्य रुग्णालयात हलविले. तेथे भाऊराव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर चालकाने तेथून पोबारा केला.
सुनीता व पप्पू यांना अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.