नदीचा गाळ काढून केले खोलीकरण
By Admin | Updated: July 18, 2014 00:44 IST2014-07-17T18:50:05+5:302014-07-18T00:44:14+5:30
आकोट तालुक्यातील दिनोडा येथील पठार नदीचा गाळ काढून नदीचे खोलीकरण करण्यात आले.

नदीचा गाळ काढून केले खोलीकरण
दिनोडा : आकोट तालुक्यातील ग्राम दिनोडा येथील पठार नदीचा गाळ काढण्यात आला. सदर गाळ हा काढून शेती उपयोगात करण्यात येऊन नदीचे खोलीकरण करण्यात आले.
दिनोडा येथील पठार नदीचे १९८२ साली खोदकाम करून नदीचे पात्र खोल करण्यात आले. या नदीत गेल्या काही वर्षापासून गाळ साचला असता दिनोडा येथील ग्रामस्थांनी नदीचा गाळ काढून शेती उपयोगात आणला. त्यामुळे नदीचे पात्राचे खोलीकरण झाले. गावकर्यांनी केलेल्या कामाची पाहणी आकोट उपविभागीय अधिकारी हिंग यांनी केली. सोबतच गावकर्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित डागा, सरपंच संजय गावंडे, उपसरपंच सुमेध आठवले, गणेश कराड, गणपत सांगळे, डिगांबर कराड, अविनाश भातकर, लोतखेडचे पो. पा. प्रवीण अवारे उपस्थित होते.